आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आष्टी न्यायालयाने पार केली ‘शंभरी’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी - 12 जानेवारी 1912 रोजी हैदराबाद येथील निझाम शासनाने आष्टी येथे न्यायालयाची स्थापना केली होती. त्यास 12 जानेवारी 2012 रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. नवीन बांधकाम झालेल्या भव्य अशा वास्तूमध्ये या न्यायालयाची स्थापना झाली होती. आता आष्टी न्यायालयाच्या इमारतीला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत.
या ऐतिहासक क्षणाचे साक्षीदार म्हणून येथील वकील संघ आणि न्यायालयीन कर्मचारी यांनी संयुक्तपणे शताब्दी महोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. 26 ते 29 जानेवारी दरम्यान चार दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आष्टीच्या न्यायालयामध्ये दिवाणी आणि कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायाधीश हे एकच पद अस्तित्वात होते. त्यानंतर 1992 पासून येथे सहदिवाणी आणि कनिष्ठस्तर प्रथमवर्ग न्यायाधीश हे दुसरे पद निर्माण झाले. येथून वकील व्यवसाय करताना सुभाष धर्माधिकारी, वसंतराव पोकळे, वर्षा पारगावकर, मधुकर दिवाण आणि अशोक शेंडगे यांची न्यायाधीशपदी निवड झाली असून या ठिकाणी आजपर्यंत 34 न्यायाधीशांनी न्यायदानाचे काम केले आहे. अलीकडेच या न्यायालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आहे.
स्मृतींना उजाळा - आष्टी न्यायालयामध्ये लाखो प्रकरणांना न्याय दिला गेला असून हजारो गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आली आहे. ताटातूट होऊ पाहणाºयांना समन्वयाने जोडण्याचेही काम येथे झाले असून आजवर दीडशेच्या जवळपास वकिलांनी या ठिकाणी काम केले आहे. या शताब्दी सोहळ्यामुळे स्मृतींना उजाळा मिळणार आहे. - अ‍ॅड. बाबूराव अनारसे, ज्येष्ठ विधिज्ञ