आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम कार्ड बदलून परस्पर काढले २० हजार; गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
परभणी- पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये तिघा जणांनी पैसे काढण्याच्या निमित्ताने एका व्यक्तीचे कार्ड बदलून २० हजार ५०० रुपये काढून घेतले. याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

तेलंगणा प्रांतातील मीरायाला गुडा (जि. नालगुडा) येथील सुतारकाम करणारे ब्रह्मचार्या बालाराया बैराजू (५८) हे ८ जुलै रोजी रोजी दुपारी दोनच्या सुमारास पाथरी येथील एसबीआयच्या एटीएममध्ये गेले होते. त्या वेळी तेथे २५ ते २८ वर्षे वयोगटातील तीन युवकांनी एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने हैदराबाद बँकेचे त्यांचे एटीएम कार्ड घेतले. त्याच वेळी हातचलाखी करीत त्यांनी बैराजू यांना नकली एटीएम कार्ड दिले. त्यांच्या एटीएम कार्डाआधारे त्या तिघांनी २० हजार ५०० रुपये काढून घेतले. काही वेळानंतर बैराजू यांनी एटीएम कार्डाचा वापर करण्याचा प्रयत्न केला असता ते कार्ड बनावट असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार दिली.
बातम्या आणखी आहेत...