आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बहुतांश एटीएम बंदच, शंभरच्या नाेटांचा तुटवडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
|बीड - सरकारने पाचशे अाणि १ हजार रुपयांच्या चलनी नाेटा बंद केल्यानंतर पंधरा दिवस हाेऊनही शंभर अाणि पन्नासच्या नाेटांचा तुटवडा अाहे, तर दाेन हजार रुपयांच्या सेटिंगअभावी बहुतांश एटीएम अद्याप बंदच असून तुरळक प्रमाणात जेथे सुरू अाहेत तेथे दाेन हजार रुपयांची नाेट मिळत असल्याने अडचणी अाहेत. अापसात देवाणघेवाण करून गरजवंत काम भागवत अाहेत. बीडमधील एसबीअाय, एसबीएच व इतर काही बँकांचे एटीएम सुरू अाहेत.

एटीएमवर दुपारपर्यंत छनछन, संध्याकाळी खडखडाट
जालना : जिल्ह्यातील १६५ पैकी १५० एटीएमचे कॅलिब्रेशन पूर्ण झाले असून त्यातून दोन हजारांची नवी नोट निघणे शक्य झाले आहे. मात्र, मोजक्याच एटीएमद्वारे पूर्णवेळ सेवा मिळत असून बहुतांश एटीएममध्ये सायंकाळी नुसता खडखडाट पाहावयास मिळत आहे. या ठिकाणी ग्राहकांची नाहक गर्दी होऊ नये, म्हणून सुरक्षा रक्षकही एटीएमचे शटर बंद करून बसत आहेत.

बँकांतील गर्दी निम्म्याने ओसरली
लातूर : केंद्र सरकारने हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतल्याच्या पंधरा दिवसांनंतर बँका व एटीएमसमोरील गर्दी निम्म्याने कमी झाल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात दिसून येत आहे.

हिंगोलीत बँकांसमोरील गर्दीत घट
हिंगोली : नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर गेले आठ दिवस सामान्य माणसाची पळापळ झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून बँकांसमोरील गर्दीत घट झाली असल्याचे दिसून येत आहे.
थेट नोटा बदलण्याऐवजी बहुतांश ग्राहकांनी आपल्या खात्यात रद्द झालेल्या नोटा जमा केल्या. त्यामुळे नोटा बदलण्यासाठीची गर्दी न्यूनतम पातळीवर आली आहे.

बहुतांश एटीएम सुरू
उस्मानाबाद : हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात उद््भवलेली गर्दीची स्थिती आता काहीशी कमी झाली आहे. बँकांमध्ये तसेच एटीएमवर गर्दी दिसत असली तरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत ताण कमी झाला आहे. शहरातील बहुतांश एटीएम सुरळीत सुरू आहेत. मात्र ग्रामीण भागातील यंत्रणा अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. सुट्या पैशांच्या तुटवड्यामुळे नागरिकांची त्रेधा उडत आहे.

चलनाचा तुटवडा कायम
परभणी : पंधरवडा उलटल्यानंतर सोमवारपासून (दि. २१) जिल्ह्यातील एटीएम मशीनवरील खातेदारांच्या रांगा कमी झाल्याचे चित्र आहे. हैदरबाद स्टेट बँक, भारतीय स्टेट बँकांच्या एटीएमसमोर तुरळक रांग असून मशीनमधून दोन हजारांचीच नोट मिळत असल्याने पुन्हा चिल्लरसाठी त्रस्त होण्याची वेळ आली आहे.
बातम्या आणखी आहेत...