आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रकमेसह एटीएम मशीनही पुढ्यात, तांत्रिक बिघाडाचा प्रकार, बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हिंगोली - एटीएममधून रोखीचे व्यवहार करताना रकमेसह हातात एटीएम मशीनचा पुढचा भाग ग्राहकांच्या पुढ्यात येण्याचा प्रकार औंढा नागनाथ येथील एसबीआय बँकेच्या एटीएम केंद्रात घडत आहे. औंढा नागनाथ येथे स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. त्यातून रक्कम काढण्यासाठी ग्राहक केंद्रात गेल्यानंतर प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यावर हातात रक्कम तर पडतेच; शिवाय पैशासोबतच एटीएम मशीनचा समोरील भागही हातात येत आहे.

या प्रकारामुळे ग्राहक चक्रावून जात आहेत. जेवढी रक्कम काढली तेवढीच हातात पडत आहे. हा प्रकार बुधवारपासून घडत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, त्याकडे बँक अधिकाऱ्यांचे काही लक्ष गेले नाही. गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हा प्रकार पुन्हा घडला. हे एटीएम येथील शाखेमार्फत चालविले जाते. याबाबत येथील शाखेत दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु शाखा अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकला नाही. मशीनमध्ये झालेल्या या बिघाडामुळे हे एटीएम केंद्र चोरट्यांसाठी आयते वाढण बनले आहे.