आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा भंडाफोड; आयएसआयने हेरगिरीसाठी वापरल्याचा संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याच इमारतीतून अवैध टेलिफाेन एक्स्चेंज चालत हाेते. - Divya Marathi
याच इमारतीतून अवैध टेलिफाेन एक्स्चेंज चालत हाेते.
लातूर/ मुंबई - संगणक नेटवर्कद्वारे व्हीओआयपी तंत्राचा वापर करून कॉल राउटिंग करणाऱ्या दोन अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा लातूर पोलिस आणि महाराष्ट्र एटीएसने शुक्रवारी रात्री भंडाफोड केला. लातूरच्या प्रकाशनगर आणि औसा रोडवरील राजीव गांधी चौक परिसरातील अवैध टेलिफोन एक्स्चेंजवर छापे टाकून रवी साबदे व शंकर बिरादार या दोघांना अटक करण्यात आली आहे. भारतीय लष्कराची अत्यंत संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तहेर संस्था या टेलिफोन एक्स्चेंजचा वापर करत असावी, असा संशय आहे.
 
जम्मू-काश्मीरमधील लष्कराच्या गुप्तहेर संस्थेला लातूरमधील या अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा पहिल्यांदा सुगावा लागला होता. लातूरमधून अवैधरीत्या आंतरराष्ट्रीय व्हॉइस कॉल राऊटिंग होत असल्याची माहिती या गुप्तहेर संस्थेने महाराष्ट्र एटीएसला दिली होती. त्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र एटीएस, लातूर पोलिस आणि दूरसंचार खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत प्रकाशनगर येथे शंकर बिरादार राजीव गांधी चौक परिसरात रवी साबदे या दोघांच्या घरांवर शुक्रवारी रात्री छापे टाकले. त्यात या अवैध व्हीओआयपी टेलिफोन एक्सचेंजचा भंडाफोड झाला. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
 
या छाप्यात आरोपींकडून अनेक मोबाइल १६० सीम कार्ड, व्हॉइस कॉलिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रे, मोबाइल्स, लॅपटॉप, सीपीयू असे लाख ६० हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींवर भारतीय टेलिग्राम कायदा १९८५ च्या कलम ४, २० आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
प्रकाशनगरमध्ये मातृछाया नामक घरातील भाड्याच्या खोलीत राहणारा शंकर रामदास बिरादार (३३) हा घरातून हे अवैध टेलिफोन एक्सचेंज चालवत होता.तेथे टाकलेल्या छाप्यात ९६ सिमकार्ड, एक कॉम्प्युटर, कॉल फॉरवर्ड करणाऱ्या तीन गेटवे मशीन, असे लाख ९० हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले. या ठिकाणाहून तब्बल कोटी रुपयांच्या मूल्यांचे कॉल झाल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले.
 
औसा रोडवरील शिवगुरू कुंज अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रवी राजकुमार साबदे (२७) यानेही डिसेंबर महिन्यापासून घरातच अवैध एक्सचेंज सुरू केले. त्यासाठी हैदराबादच्या एका व्यक्तीची मदत त्याला झाली. छाप्यात त्याच्याकडे मोबाइल, ६४ सिमकार्ड, लॅपटॉप, इंटरनेट मोडेम, गेटवे मशीन असे एकूण लाख ७३८०० रुपयांचे साहित्य सापडले. रवी साबदे हा मूळचा चाकूर तालुक्यातील जानवळचा रहिवासी असून त्याच्या गावातील घरावरही छापा टाकलण्यात आला. रवीने केलेल्या कॉलपोटी दूरसंचार विभागाचे कोटी लाख २५६०० रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

व्हीओआयपी तंत्राचा व्हॉइस कॉलसाठी वापर
व्हाॅइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) तंत्राचा वापर करून संगणक नेटवर्कद्वारे या एक्स्चेंजमधून आंतरराष्ट्रीय दूरध्वनी कॉल करण्यात येत होते. या तंत्रात नियमित टेलिफोन लाइनचा वापर न करता इंटरनेट कनेक्शनचा वापर करून कुठेही कॉल करता येतात.

आंतरराष्ट्रीय गेटवेने कॉल केले ट्रान्सफर
अवैध आंतरराष्ट्रीय गेटवेच्या माध्यमातून आरोपी रवी साबदे व शंकर बिरादार हे इंटरनेटवर आंतरराष्ट्रीय व्हॉइस कॉल रिसीव्ह करत होते आणि ते कॉल भारतातील रिसीव्हरला ट्रान्सफर करून देत होते.
 
आयएसआयकडून तंत्राचा सर्रास वापर
भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती हस्तगत करण्यासाठी पाकिस्तानची इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स अर्थात आयएसआय ही गुप्तहेर संस्था व्हीओआयपी टेलिफोन एक्स्चेंजचा सर्रासपणे वापर करते, असे सूत्रांनी सांगितले.
 
व्हीओआयपी कॉल्सची दूरसंचार खात्याच्या प्रणालीत नोंदच होत नाही
या टेलिफोन एक्स्चेंजमधून आंतरराष्ट्रीय कॉल स्थानिक मोबाइल क्रमांकावरून केले जात होते. यातील काही कॉल शेजारील राष्ट्रातही झाले. तसेच तेथून काही कॉल आले आहेत. हे कॉल सेंटर अधिकृत नसल्यामुळे त्याची दूरसंचार खात्याकडे नोंद होत नव्हती. शेजारील राष्ट्रांत कॉल होत असल्यानेे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
 
इंटरनेट/मोबाइल कनेक्शन जोडलेली प्रणाली अवैध
भारतीय दूरसंचार कायद्यानुसार इंटरनेट/ व्हीओआयपी आणि मोबाइल कनेक्शनशी इंटरकनेक्टेड व्हॉइस कॉलिंग प्रणालीला परवानगी नाही. अशा प्रकारची व्हीओआयपी कॉलिंग प्रणाली राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याची असल्यामुळे ती अवैध ठरवण्यात आली आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, लाखाच्या गुंतवणुकीत 15 कोटींची फसवणूक, पोलिसही चक्रावले...