आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेच्या गाडीवर दगडफेक, भगवानबाबा समाधीच्या दर्शनाविनाच परतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - भगवानबाबा समाधी दर्शनासाठी आलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांना हुल्लडबाज कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांना दर्शनाविणाच परतावे लागले आहे. त्यांच्या गाडीवर दगडफेक देखील करण्यात आल्याचे वृत्त आहे. हुल्लडबाजी करणारे लोक राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे.
श्री क्षेत्र भगवानगडावर भगवानबाबा समाधी सुवर्ण महोत्सव सप्ताह सुरु आहे. मंगळवारी या सप्ताहाची सांगता होत आहे. यानिमीत्ताने विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सोमवारी सकाळी समाधी दर्शनासाठी आले होते. मात्र, येथे उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना गडावर जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या सर्व प्रकाराने भगवानगडावरील वातावरण बदलून गेले. गडाचे विश्वस्त नामदेव शास्त्री यांनी हुल्लडबाजांना शांततेचे आवाहन केले. अशा वागणूकीमुळे गडाची बदनामी होईल असे बजावल्यानंतरही धनंजय मुंडे विरोधक शांत झाले नाही. त्यांनी हुल्लडबाजी सुरुच ठेवली. या प्रकारामुळे नाराज झालेले धनंजय मुंडे समाधीचे दर्शन न घेताच आल्या पावली परत गेले.
धनंजय मुंडे हे दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आहेत. मुंडेच्या हयातीतच त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसची कास धरली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना मुंडेची कन्या पंकजा यांच्याविरोधात परळी येथून उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी धनंजय यांना विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेतेपद दिले आहे.

पुढील स्लाइडवर - हल्ला पुर्वनियोजित
(संग्रहित छायाचित्र )