आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attack On Naib Tahasildar Because Of Public Foods Inquary

स्वस्त धान्य दुकानाच्या चौकशीच्या कारणावरून बीड मध्‍ये नायब तहसीलदारावर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करून परवाना रद्दची कारवाई का करतो असे म्हणत चौघांनी बीडचे नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांच्यावर भर रस्त्यात हल्ला चढवला. ही घटना अंबिकानगर चौक रोडवर शनिवारी रात्री साडेआठ वाजता घडली. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


सिद्धू बाबूराव मस्के असे आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या आईच्या नावावर शिवाजीनगर येथे स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानाची फेरचौकशी करावी, अशी मागणी त्याची होती. यासाठी तो धस यांच्याकडे हट्ट धरून बसला होता. दरम्यान, आरोपीसह अन्य तिघांनी त्यांच्यावर शनिवारी हल्ला चढवला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. धस यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डी.एस. हरणे करत आहेत.