आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगावात मच्छीमारांवर हल्ला; 113 जणांवर ग्रामीण ठाण्यात गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- माजलगाव धरणात मासेमारी करू नये, यासाठी धरणाचा ठेका स्वत:कडे असलेल्या संस्थेच्या काही लोकांनी नागपंचमीच्या दिवशी भोईवस्तीवर काठ्या, कु-हाडी, तलवारींसह हल्ला चढवला. या हल्ल्यात नऊ महिलांसह चार पुरुष गंभीर जखमी झाले आहेत.मासेमारीचा ठेका माणिक शहा मत्स्यसंस्थेकडे आहे. या संस्थेने ठेका एक वर्ष वाढवून घेतला आहे. ठेका रद्द करून धरण मच्छीमारांसाठी खुले करण्यासाठी मच्छीमारांनी माजलगाव तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केली. तीन महिन्यांपासून ठेकेदार व मच्छीमारातील वाद विकोपाला गेला आहे. मच्छीमारांच्या मागण्यासाठी आव्हान संघटनेचे डॉ.उद्धव नाईकनवरे, लोक शासनचे पदाधिकारी व माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील, विशाल कदम यांनी वाढीव ठेका रद्द करण्यासाठी 1 जुलै रोजी माजलगाव येथे आंदोलन केले. तेव्हापासून ठेकेदार व मच्छीमारांत धुसफूस सुरू होती. शुक्र वारी सकाळी साडेआठ वाजता माणिकशहा मत्स्य संस्थेचे अय्यूब सत्तार, दादामियाँ, शेख मुक्तार शेख सत्तार, शेख इफ्तियार शेख सत्तार, शेख वाहेद शेख सत्तार, शेख फारूक शेख सत्तार, शेख सादेक शेख सत्तार, शेख जमिर शेख सत्तार, शेख बशीर, शेख अंजुम, शेख दिलावर, शेख महंमद शेख अन्सर यांच्यासह 100 जणांनी भोईवस्तीवर हल्ला केला.

मारहाणीत गर्भवती जखमी

हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात कमलबाई युवराज धानुरे, कुसुम सखाराम लमारे, अनुसया मारोती घटे, अरूणा भिमा पल्लारे, सुमन मच्छिंद्र फुलभैय्या, रू क्मीन तुकाराम फुटारे, यासह पांडूरंग घटे,वैजीनाथ धनुरे,नंदू बिजुले,शिवाजी कचरे जखमी झाले आहेत. राधा लिंबोरे ही चार महिन्याची गर्भवतीसुद्धा जखमी झाली.