आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औंढ्यात रथोत्सवासाठी नवीन रथ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- औंढा नागनाथ येथे गेल्या वर्षी रथोत्सवादरम्यान मोडकळीस आलेला रथ अंगावर कोसळून पुजार्‍याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंदिर संस्थानने नवीन रथ तयार करण्याचा निर्णय प्रत्यक्षात साकारला असून दुर्घटनेच्या कटू आठवणींना उजाळा देत 10 मार्चला पुन्हा रथोत्सव होणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ येथे दरवर्षी रथोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. गेल्या वर्षी फेबु्रवारीमध्ये हा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात सुमारे 20 हजार भाविक रथ ओढण्यासाठी दाखल झाले होते. कार्यक्रम साधारणत: रात्री 10 च्या नंतर सुरू झाला आणि नागनाथ मंदिराला रथाच्या फेºया मारत असताना रथाचे एक चाक निखळले आणि रथ उलटला.
या अपघातात प्रवीण पाठक (40) या तरुण पुजाºयाच्या अंगावर सुमारे 10 क्विंटल वजनाचा रथ कोसळला आणि पुजाºयाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात 8 भाविकही जखमी झाले होते. तेव्हापासून सुमारे 30 वर्षांपासून महाशिवरात्रीच्या फेºया मारणाºया या रथाला मंदिराच्या आगारात ठेवण्यात आले असून, संस्थानच्या वतीने नवीन रथ तयार करण्यात आला आहे.
या वर्षी 10 मार्च रोजी महाशिवरात्रीनिमित्त रथोत्सव कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये भाविक हा रथ ओढणार आहेत. देवस्थानच्या वतीने अडीच लाख रुपये खर्च करून सागवान लाकूड आणि विविध धातूंचा उपयोग करून हा रथ तयार करण्यात आला आहे. चंदनाभाई पटेल आणि राजूभाई पटेल या कारागिरांनी अहोरात्र मेहनत घेऊन चार महिन्यांत हा रथ तयार केला आहे.