आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडीच लाख भाविकांनी घेतले औंढ्याच्या नागनाथाचे दर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - श्रावण महिन्यात दरवर्षी मराठवाडा, विदर्भासह व आंध्र प्रदेशातील कावडी आठवे ज्योतिर्लिंग औंढ्याच्या नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी नागनाथ मंदिरात दाखल होतात. यावर्षी दीडशे कि.मी.पर्यंतचा पायी प्रवास करून 50 कावडींतील एक हजार भाविकांनी तर तिस-या श्रावण सोमवारी अडीच लाख भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतल्याची नोंद आहे.
श्रावण महिना सुरू झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी गंगेचे जल घेऊन भाविक कावड घेऊन नागनाथाच्या दर्शनासाठी येत आहेत. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, जालना, उस्मानाबाद व विदर्भातील वाशिम, यवतमाळ, बुलढाणा तर आंध्र प्रदेशातील म्हैसा, मुधोळ आदी भागातील भाविक कावड घेऊन दिंडीमध्ये नागनाथाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. विविध भागांतील पन्नासपेक्षा जास्त कावडी औंढा नागनाथ मंदिरात यावर्षी आल्याची नोंद संस्थानमध्ये आहे. कावडीमध्ये सहभागी भाविक नागनाथ मंदिरात आल्यानंतर नागनाथाला गंगेच्या अथवा कुंडातील पाण्याने अभिषेक घालतात. श्रावणातील तिस-या सोमवारी सुमारे सात ते आठ कावडधारीतील शंभरापेक्षा जास्त भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले. दिवसभरात आडीच लाख भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतले.'