आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: चालकाला हृदयविकाराचा झटका, क्रुझर दुभाजकाला धडकली; 1 ठार, 9 जण जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलगाव (जालना) - क्रुझर चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर ९ जण जखमी झाले. बदनापूर तालुक्यातील संत सेवानगर तांड्याजवळ शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेदरम्यान हा अपघात झाला. खंडू तात्याराव तोतमल असे या अपघातातील मृताचे नाव आहे. असाच धक्कादायक प्रकार बुधवारी कोल्हापूरमध्ये घडला होता. धावत्या बसमध्ये चालकाला ह्रद्य विकाराचा धक्का बसल्याने, बसने 3 चारचाकींसह 8 बाइकला चिरडले होते. 
 
औरंगाबाद येथील उद्धव वाढेकर हे कुटुंबियांसह बुलडाणा जिल्ह्यातील चिखली जवळील एका गावात घरगुती कार्यक्रमासाठी क्रुझर (एम.एच. २१, ए. एल. ५४५५) ने जात हाेते. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेदरम्यान ते बदनापूर तालुक्यातील संत सेवा नगर तांड्याजवळ पोहचले. त्याचवेळी क्रुझर चालक खंडू तात्याराव तोतमल (३२ रा.सोनवाडी ता.पैठण ) यांना अस्वस्थ वाटू लागले. हा प्रकार इतरांना कळविण्यापूर्वीच त्यांना ह्यदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे क्रुझर दुभाजकाला जाऊन धडकली व तिनवेळा पलटी झाली व शेजारच्या शेतात जाऊन पडली. यामध्ये चालक खंडू तोतमल हे जागीच ठार झाले तर क्रुझर मधील उद्धव वाढेकर, अंजली वाढेकर, अनिता वाढेकर (रा.सिडको औरंगाबाद) हे तिघे जण गंभीर जखमी झाले. तसेच अजय वाळेकर, राजेश वाळेकर, विजय वाळेकर, साक्षी वाळेकर, अनुष्का वाळेकर, प्रसाद वाळेकर हे सहा जण जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच बदनापूर पोलीस ठाण्याचे पेालिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, जगदाळे, शेख कय्युम, शेख इब्राहिम यांनी घटनास्थळी भेट देऊन चालकास बदनापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. इतर जखमींना औरंगाबाद येथील खासगी रुगणालयात दाखल करण्यात आले.
 
हे ही वाचा, 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...