आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आैषध खरेदी घोटाळ्यात आरोग्यमंत्र्यांना नाेटीस, हायकोर्टाच्या अाैरंगाबाद खंडपीठाचे अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - राज्यातील अाराेग्य खात्यात झालेल्या २९७ कोटी रुपयांच्या आैषध खरेदी घोटाळ्यासंबंधी दाखल जनहित याचिकेत मंुबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाने बुधवारी आरोग्यमंत्र्यांसह इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या घाेटाळ्याबाबत ३० सप्टेंबर २०१६ रोजी प्राप्त झालेले पत्र खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. के. के. सोनवणे यांनी जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतले आहे. याचिकेत अॅड. देवदत्त पालोदकर यांची न्यायालयाचे मित्र म्हणून नेमणूक केली अाहे. बुधवारी आरोग्य मंत्र्यांसह मुख्य सचिव तसेच सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, नगरविकास, ग्रामीण विकास, आदिवासी कल्याण विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावण्यात आली आहे. आैषधी खरेदी घोटाळ्यासंबंधी शासनाने गाैतम चटर्जी, डॉ. भगवान सहाय, मिलिंद म्हैसेकर आदींच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमल्या हाेत्या, परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही. आर. सी. अय्यर यांच्या समितीचा अहवाल शासनाकडे पडून असला तरी कारवाई झाली नसल्याचे याचिकेत नमूद आहे. चुकीची अथवा मुदत संपलेली आैषधी दिल्याने रुग्णास जिवाला मुकावे लागले, अशी अनेक उदाहरणे याचिकेत देण्यात आली आहेत. या प्रकरणातील तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने चाैकशीचे अादेश दिले हाेते.

१८ नाेव्हेंबरला पुढील सुनावणी
याचिकेच्या सुनावणीप्रसंगी हायकोर्टाने अनेक निरीक्षणे नोंदवली असून पुढील सुनावणी १८ नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे. शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी बाजू मांडली.
बातम्या आणखी आहेत...