आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad\'s Four Citizen Died Due To Submerging In Matrithrth

माहूरच्या मातृतीर्थात बुडून औरंगाबादच्या चौघांचा मृत्यू; मृतांत आई, मुलगी, मुलगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - माहूरमध्ये मातृतीर्थावर स्नानासाठी गेलेल्या औरंगाबादच्या क्षीरसागर कुटुंबातील चौघे शुक्रवारी सकाळी बुडून मरण पावले. हृदय पिळवटून टाकणा-या या दुर्घटनेत प्रदीप क्षीरसागर यांची पत्नी, मुलगी, चिमुकली नात व एकुलता एक मुलगा काळाने हिरावून नेला.
प्रदीप क्षीरसागर (65, देशमुखनगर, गारखेडा) यांचे कुटुंब गुरुवारी रात्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी माहूर येथे पोहोचले. एकवीरा या भक्तनिवासात ते मुक्कामाला होते. पहाटे साडेपाचच्या सुमारास उषा प्रदीप क्षीरसागर (60) यांनी मातृतीर्थावर स्नान करून देवीच्या दर्शनाला जाऊ, असा आग्रह धरला. त्यामुळे प्रदीप क्षीरसागर, त्यांचा मुलगा नीलेश (34), मुलगी प्रांजली अमोल देवडे (34) व नात अवनी अमोल देवडे (2) हे सर्वजण कारने मातृतीर्थावर गेले. सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रथम महिला अंघोळीसाठी गेल्या. प्रदीप, नीलेश व ड्रायव्हर नारायण सुखदेव जाधव कारमध्ये थांबले. सव्वासहाच्या सुमारास त्यांना महिलांची आरडाओरड ऐकू आली. तिघेही मातृतीर्थाकडे गेले तेव्हा दोन्ही महिला बुडताना दिसल्या. त्यामुळे नीलेशनेही पाण्यात उडी मारली. पाणी खोल असल्याने तोही बुडू लागला. तेव्हा ड्रायव्हर नारायणने उडी मारून अवनीला बाहेर काढले. त्याने महिलांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत सर्वांचा बुडून मृत्यू झाला होता.