आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमधील नागरिकांचा निर्धार; बससेवेचे आश्वासन देणाऱ्यांनाच मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अनेकभागांत शहर बसची व्यवस्था नसल्याने रिक्षाचालक प्रवाशांना वेठीस धरत आहेत. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. शहर बसचा विस्तार करण्यासाठी कोण पुढाकार घेणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. ज्या पक्षाचा उमेदवार शहर बसची व्यवस्था सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन देईल, त्यालाच मतदान करू, अशी भूमिका काही नागरिकांनी घेतली आहे.
पर्यटन स्थळे, डीएमआयसीमुळे जगाच्या नकाशावर औरंगाबाद पोहोचले आहे. येथील लोकसंख्या १५ लाखांवर गेली; पण सिटी बसची व्यवस्था केवळ नावालाच आहे. जो उमेदवार शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत बसचा विस्तार करण्याचे आश्वासन देईल, त्यालाच मतदान करण्याचे आवाहन अजय तलरेजा, वसंत शिंदे, तुकाराम देशमुख, सुरेश वाकडे, प्रदीप शिंदे, जय कांबळे, सुनीता दांडगे यांनी केले आहे.
इच्छाशक्तीचा अभाव
^बससेवाउपलब्ध करण्याबाबत लोकप्रतिनिधींमध्ये इच्छाशक्ती नाही. रात्री आठनंतर बस मिळत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे उमेदवारांनी मते मागण्यापूर्वी शहर बस सेवा देण्याचे वचन द्यावे. वसंतगोविंदराव शिंदे, ज्येष्ठनागरिक, पारिजातनगर.