आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादच्या पोलिसाचा धुळ्यात अपघाती मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - धुळे जिल्ह्यातील धमाणे शिवारात नादुरुस्त डंपरवर मोटारसायकल आदळल्यामुळे औरंगाबाद येथे कार्यरत असलेला पोलिस कॉन्स्टेबल ठार झाल्याची घटना गुरुवारी घडली.

मनोज रोहिदास शिरसाठ (30, रा. शिरपूर, जि. धुळे) असे मृताचे नाव आहे. शिरसाठ सध्या सुटीवर आले होते. त्यांचे सासरे धुळ्यात राहतात. कुटुंबीय व शहादा येथे राहणार्‍या बहिणीला भेटण्यासाठी मनोज शिरसाठ मोटारसायकलने गावी गेले होते. बुधवारी रात्री मनोज मोटारसायकलने धुळ्याकडे येण्यास निघाले. रात्री धुळ्यात मुक्काम करून गुरुवारी सकाळी त्यांना पुन्हा ड्यूटीवर रुजू व्हायचे होते. या वेळी धुळ्याकडे येताना धमाणे फाट्याजवळ नादुरुस्त डंपर वर त्यांची दुचाकी आदळली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी डंपर चालक नामदेव वाघमारे (मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(फोटो - मनोज रोहिदास शिरसाठ)