आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लासूरजवळ मराठवाड्यातील पहिले स्वयंचलित रेल्वेगेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन - परसोडा, करंजगाव, लासूर, पोटूळ तसेच करमाड रेल्वेस्टेशनचे भाग्य लवकरच उजळणार आहे. विविध कामांसाठी निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे. मराठवाड्यातील पहिले स्वयंचलित रेल्वे गेट लासूरस्टेशन येथे होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी यांनी दिली.

मागील अनेक वर्षांपासूनची ही मागणी रेल्वे नांदेड विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा व वरिष्ठ अभियंता राज वानखेडे तसेच विभागीय अभियंता चंद्रमोहन यांनी मान्य करून जानेवारी २०१६ अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होणार आहे. या कामांना ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. २९ जानेवारी २०१४ रोजी रेल्वेचे मंडल व्यवस्थापक पी. सी. शर्मासह वाहतूक निरीक्षक एल. के. जाखडे यांच्यासमवेत रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी यांनी बैठक घेऊन विविध स्थानकांची पाहणी करून मागणी केली होती. या कामांमुळे परसोडा, भिवगाव, शिवराई, बंेदवाडी, करंजगाव, पालखेड, धोंदलगाव, लासूरगाव, सावंगी, दायगाव, पोटूळ, वाघलगाव, रांजणगाव पोळ आदी भागातील नागरिकांची सोय होणार आहे. परंतु आता या ठिकाणी स्वयंचलित रेल्वेगेट होणार असल्याचे त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही कामे होणार
परसोडा येथे निझामकालीन रेल्वेची इमारत आहे. त्या जागी नवीन इमारत तसेच उंचीचे गावाच्या बाजूने प्लॅटफॉर्म करण्यात येणार आहे. करंजगाव येथे एक प्लॅटफाॅर्म असून येथे आणखी एक प्लॅटफाॅर्म तयार करण्यात येणार आहे. पोटूळ येथे प्लॅटफाॅर्म नाही. प्रवाशांना रेल्वेत चढण्या- उतरण्यासाठी त्रास होतो. त्यासाठी अधिक उंचीचे प्लॅटफाॅर्म तयार करण्यात येणार आहेत. तसेच करमाड येथे नवीन इमारत व अधिक उंचीचा प्लॅटफाॅर्म तयार करण्यात येणार आहे. लासूर स्टेशन येथे गेट क्र.३४ गंगापूर - देवगाव मार्गाचे ३७ फुटांपर्यंत रुंदीकरण करून दुभाजक बसवण्यात येईल.

वाहतुकीची कोंडी
देवगाव - गंगापूर मार्गावरील सावंगीजवळ असलेल्या अरुंद रेल्वे गेटमुळे येथे वारंवार वाहतुकीचा खाेळंबा होतो. रेल्वे गेल्यानंतर येथे वाहतुकीची कोंडी फुटण्यास तासनतास लागतात. त्यामुळे स्थानिकांना किरकोळ कामांसाठी येथे अडकूण पडावे लागत असल्याचे प्रकार पाहावयास मिळतात. येथील रेल्वे गेटची रुंदी केवळ पंधरा फूट असल्याने दोन्ही बाजूंची वाहने निघण्यास अडचणी येतात.

स्वयंचलित रेल्वेगेटने वाहतूक होणार सुरळीत
लासूर स्टेशन येथे गेट क्र. ३४ गंगापूर - देवगाव मार्गावरील नांदेड रेल्वे विभागाचे हे मराठवाड्यातील पहिले इलेक्ट्रॉनिक गेट बसवण्यात येणार आहे. हे गेट पूर्णपणे स्वयंचलित असणार आहे. यामुळे वाहतुक सुरळीत होईल.
बातम्या आणखी आहेत...