आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधीच्या टीकेला बबनराव लोणीकरांचे उत्तर म्हणाले, तेव्हा राहुल गांधी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/परभणी- भाजप नेते आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भाषा घसरली. मराठवाड्याच्या दौऱ्यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर बोलताना लोणीकर यांनी मिमिक्रीही केली
.
लोणीकर यांनी राहुल गांधींच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केली. “राहुल गांधी झोपेत होते की दारु प्यायले होते? ज्याला कोणी पोरगी देत नाही, ज्याचे लग्न होत नाही तो मोदी, मोदी का करतो? भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याचे पुतळे जाळायला हवे होते,” असे लोणीकर म्हणाले. “नरेंद्र मोदींवर जर कोणी टीका करत असेल तर इट का जवाब पत्थर से द्या. टीका करणाऱ्यांच्या सभा उधळा, पुतळे जाळा आणि त्यांचा निषेध करुन बातम्या छापून आणा,” असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
हेही वाचा
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...