आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babasaheb Purandare And Maharashtra Bhushan Award

महाराष्ट्र भूषण मागे घेण्याची मागणी, कुठे दगडफेक, कुठे रास्ता रोको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी/ सिरसाळा - ब. मो. पुरंदरे यांना देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घेण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बुधवारी बीड जिल्ह्यातील वडवणी व सिरसाळा येथे मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

वडवणी येथे बुधवारी शिवप्रेमींनी रस्त्यावर उतरून राज्य सरकार व पुरंदरे यांच्याविरुद्ध घोषणा दिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, स्व. वसंतराव नाईक चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संभाजी महाराज चौकातून बीड-परळी राज्य महामार्गावरून मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात महादेव जमाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष डावकर, संतोष गोंडे, नारायणराव शेंडगे, भोलानाथ लंगे आदी सहभागी झाले होते. तहसीलदार एन. जी. झंपलवाड यांना निवेदन दिले. तर परळी तालुक्यातील सिरसाळा येथील परळी चौकात शिवप्रेमींनी निदर्शने केली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय माेरे, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब गरड, शिवक्रांतीचे दत्तात्रय गव्हाणे, शीतलदास आरसुळे, जावेद पठाण, मिलिंद भोसले, मनोज आचार्य, जगमित्र पौळ, नितीन निर्मळ,अर्जुन काळे सहभागी झाले.

कंधार-नांदेड बसवर दगडफेक
नांदेड-लोहा मार्गावरील वाडी फाट्याजवळ बुधवारी दुपारी दोन वाजता अज्ञातांनी कंधार-नांदेड बसवर (एमएच २० डीएल १६३०) दगडफेक करून समोरची काच फोडली. बस दुपारी कंधारहून नांदेडकडे येत असताना तीन मोटारसायकलींनी बसचा सोनखेडपासून पाठलाग केला. वाडीफाट्याजवळ त्यांनी बस थांबवण्यास चालकाला भाग पाडले. सर्व प्रवाशांना खाली उतरून त्यांनी बसवर दगडफेक केली.
लातूर-औसा मार्गावर संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोको
बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यात येऊ नये म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने औसा तालुक्यातील सिरसल पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी ५२ जणांना ताब्यात घेऊन सोडून दिले. सुमारे तासभर रास्ता रोको करण्यात आल्याने लातूर- औसा मार्गावरील वाहतुकीची कोंडी झाली. हणमंत कुमठे, नागनाथ बाभळसुरे, परमेश्वर भोसले, रियाज शेख, प्रताप हांडे, दत्ता पाटील, जीवन बाभळसुरे, मोहन गायकवाड, माधव हंडे, प्रशांत कुमठे आदी तरुणांनी या आंदोलनात सहभाग घेतला. या वेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.