आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babasaheb Purandares Maharashtra Bhushan Award Issue At Beed

पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला बीड जिल्ह्यात विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी जिल्ह्यातील गेवराई, परळी, धारूर येथे शिवप्रेमी संघटनांनी रस्त्यावर येऊन विरोध दर्शवला. गेवराई तालुक्यातील उमापूर फाट्यावर संभाजी ब्रिगेड उदयनराजे सेनेच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरंदरे यांना देण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.

सकाळी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अनेक युवक सहभागी झाले होते. धारूरमध्ये संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजी चौकात निदर्शने करून पाच वाहनांची हवा सोडली. यात राम शिनगारे यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते, तर परळीतील शिवाजी चौकात मंगळवारी तीव्र निदर्शने करण्यात आली. शहरातील शिवप्रेमी संघटनांनी सकाळी साडेअकरा वाजता निदर्शने केली.या वेळी सरकारच्या विरोधात शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय मोरे, नगरसेवक किशोर पारधे, अय्युब पठाण, सुरेश नानवटे, शंकर कापसे, अनंत इंगळे, संतोष शिंदे, राम सोळंके आदी सहभागी झाले होते.