आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babasaheb Purandares Maharashtra Bhushan Award Issue At Marathwada

संभाजी ब्रिगेडचा बंद, रास्ता रोको, 'पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- राज्य शासनाने बाबासाहेब पुरंदरेंना जाहीर केलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडसह विविध शिवप्रेमी संघटनांच्या वतीने मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास वसमत रस्त्यावरील काळी कमानसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

संभाजी ब्रिगेडसह वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद विविध शिवप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या जातीय तेढ निर्माण करणाऱ्या तसेच जिजाऊ-शिवरायांची बदनामी करणाऱ्या पुरंदरेंना राज्य शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ केला आहे, असे नमूद करत संभाजी ब्रिगेडने हा पुरस्कार रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसमत रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.
जिल्हाधिकार्‍यांना जालन्यात निवेदन
जालना- बाबासाहेबपुरंदरे यांना जाहीर झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करण्याची मागणी विविध संघटनांच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. निवेदनावर लक्ष्मण नेव्हल, संतोष राजगुरू यांची स्वाक्षरी आहे.
वसमतमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद
हिंगोली - पुरंदरेयांना घोषित झालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येऊ नये या मागणीसाठी मंगळवारी वसमत येथे शिवप्रेमी तरुणांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संघटनांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारपेठ, पोलिस ठाणे, बाजारपेठ भागांतील व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली, तर नांदेड रस्ता, हिंगोली रस्ता आदी भागात काही दुकाने चालू होती.