आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा दानवे जेथे भेटेल तेथे त्याचे तोंड रंगवले जाईल, आमदार बच्‍चू कडू यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - २० लाख टन तूर आयात करताना तूर निर्यातीवर बंदी घालणे म्हणजे शेतकऱ्यांवर तलवार चालवणेच होय. सरकारच्या या विघातक निर्णयाविरुद्ध शेतकऱ्यांनी पेटून उठण्याची गरज असल्याची संतप्त प्रतिक्रिया देतानाच आमच्या शेतकऱ्यांना साले म्हणणारा भाजपचा दानवे ज्या ठिकाणी भेटेल तेथे त्याचे तोंड रंगवले जाईल, असा इशाराही आमदार बच्चू कडू यांनी वसमत येथे बोलताना दिला.  
 
बुधवारी दुपारी २ च्या सुमारास वसमत येथील आसेगाव रोडवरील ओम गार्डन मंगल कार्यालयात राजे संभाजी जयंती महोत्सव समितीच्या वतीने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आमदार कडू प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. या वेळी विचारपीठावर डॉ. नागनाथ काळे,  प्रा. रामभाऊ मुटकुळे,  युवा नेते सचिन भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती. आ. कडू म्हणाले की, या देशात या पूर्वीच्या सरकारने जे पाप करून ठेवले आहे तेच पाप भाजप सरकारसुद्धा पुढे चालवत आहे. परंतु शेतकऱ्यांनी स्वस्थ न बसता सरकारला धडा शिकवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन आमदार कडू यांनी केले.
 
शेतकऱ्यांनी अनेक पिके बदलून पाहिली, तसे सरकारही बदलून पाहिले; पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. रामदेव बाबांची औषधे जर विदेशात जाऊ शकतात तर जगभरात मागणी असलेली आमच्या शेतकऱ्यांची तूर आणि इतर कृषी उत्पादने विदेशात का जाऊ शकत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. सरकारने केवळ  खाणाऱ्यांचा विचार केला; पिकवणाऱ्यांचा विचार केला नाही, आता मात्र तीच पोर शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर आली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले. शासन काय करणार, याची तमा न बाळगता हे काम झाल पाहिजे, त्यासाठी मी सदैव सोबत आहे, असे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...