आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bahujan Samaj Party News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘हत्ती’ वाचवण्यासाठी बहुजन समाज पक्षाचे ‘करो या मरो’, राष्ट्रीय दर्जा धोक्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - आयोगाने २००० मध्ये लागू गेलेल्या नियमानुसार राष्ट्रीय दर्जा टिकवण्याशिवाय महत्त्वाचे म्हणजे दलित, बौद्धांची अस्मिता असलेल्या हत्ती चिन्हाला वाचवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक बसपासाठी ‘करो या मरो’ची झाली आहे.

आयोगाने २ डिसेंबर २००० रोजीच्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे राज्य आणि राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी नियमावली ठरवली आहे. त्यानुसार, किमान चार राज्यांमध्ये किमान ६ टक्के मतदान होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कोणत्याही एका राज्य विधानसभेत चार आमदार निवडून गेले पाहिजेत किंवा किमान तीन राज्यांमधून लोकसभेवर ११ खासदार निवडून गेले पाहिजेत. नुकत्याच झालेल्या लोकसभेत बसपाचा एकही खासदार निवडून गेला नाही. त्यामुळे दुस-या नियमासाठी बसपा पात्र ठरत नाही. त्यामुळे ६ टक्के मतदान आणि आमदार निवडून आणण्यावर बसपा पूर्ण ताकद लावत आहे.
बसपा राज्यातील सर्व जागा नेहमीप्रमाणे स्वबळावर लढवत आहे. हत्तीला बाचवण्यासाठी बसपा प्रमुखांनी महाराष्ट्र निवडणुकीसाठी राज्याचे दोन भागांत विभाजन केले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि खान्देश, नगर या भागांतील १४४ जागांची जबाबदारी राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने यांच्याकडे दिली आहे.