आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉ. मुंडे दांपत्याचा जामीन अर्ज फेटाळला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - डॉ. सुदाम मुंडे दांपत्याविरुद्ध परळी न्यायालयाने एका प्रकरणी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यामुळे अंबाजोगाई येथील सत्र न्यायालयात डॉ. मुंडे यांनी अंतरिम जामीनसाठीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
डॉ. सुदाम व सरस्वती मुंडे यांच्या रुग्णालयात लेक लाडकी अभियानच्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी 21 सप्टेंबर 2010 रोजी स्टिंग आॅपरेशन करून भ्रूणहत्या करताना परळीचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास दुधाळ यांच्या तक्रारीवरून दांपत्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात दांपत्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर झालेल्या दोन्ही प्रकरणात त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असून ते फरार आहेत. त्यामुळे सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. अतुल तांदळे यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्याची मागणी येथील न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी.पी. खंडेलवाल यांनी दांपत्याविरुद्ध सप्टेंबरच्या प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे डॉ. मुंडे यांच्या वतीने दाखल अंतरिम जामिनाचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. टी. महाजन यांनी फेटाळून लावला.
जामिनासाठी धडपड
याप्रकरणी सरकारच्या वतीने बाजू मांडण्यासाठी 11 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. अडचणीत सापडल्याने डॉ. सुदाम मुंडे सध्या पत्नीसह फरार असून जामीन मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
पटेकरला कोठडी
डॉ. सुदाम मुंडे यांच्या रुग्णालयात गर्भपातादरम्यान मृत्यू झालेल्या विजयमाला पटेकर हिचा पती महादेव पटेकर याला परळीच्या न्यायालयाने बुधवारी 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.