आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३ लाखांच्या बकऱ्याला खरेदीदार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेडः मुस्लिम बांधवांच्या बकरी ईदला कुर्बानीचे फार महत्त्व असते. कुर्बानीच्या निमित्ताने बकऱ्यांना चांगली किंमतही मिळते. शहरातील देगलूर नाक्यावर विक्रीला आलेल्या बकऱ्याच्या मालकाने बकऱ्याची किंमत ३ लाख रुपये ठेवली, परंतु अद्याप त्याला ग्राहक मात्र मिळाले नाही.
सणासुदीला जीवनाश्यक वस्तूंच्या किमती वाढतात हा नेहमीचाच अनुभव आहे. बकरी ईदला मुस्लिम बांधवांत कुर्बानीचे महत्त्व असते. त्या निमित्त गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्व मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. एकाच दिवशी मोठ्या संख्येने बकरे लागणार असल्याने या दिवसापूर्वी बकऱ्याच्या किमतीही वाढतात. त्यातच आता गोवंश हत्याबंदीचा कायदा आल्याने बकऱ्याशिवाय अन्य पर्यायही नाही. ही गरज लक्षात घेऊन बकऱ्यांच्या मालकांनी किमतीत भरमसाट वाढ केली. शहरातील देगलूर नाक्यावर सध्या बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यातही बकरे ८ हजार रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यत विक्री होत आहेत. या बाजारात लोहा तालुक्यातील टाकळगाव येथील संभाजी चिंचोरे यांनी विक्रीसाठी आणलेल्या बकऱ्याची किंमत पाहून सर्व सामान्यांचे डोळे फिरण्याची वेळ आली आहे.