आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू विक्री बंदीसाठी महिलांचा ठिय्या, सोयगाव पोलिसांना दिले निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव - तालुक्यातील गलवाडा (अ) येथे विनापरवाना बनावट देशी दारू विक्री होत आहे. या अवैधरीत्या होणाऱ्या दारू विक्रीवर पोलिस प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे हा व्यवसाय दिवसाढवळ्या सुरू अाहे. यातून दारू विक्रेता व पोलिस प्रशासन यांचे संबंध असल्याचे उघड होत आहेत. दारू विक्रेत्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून गुन्हे नोंदवावे, यासाठी गलवाडा येथील अवैध दारू विक्री बंदी महिला मंडळाच्या वतीने पोलिसांना तक्रार देण्यात आली व ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलिस निरीक्षकांनी कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

गलवाडा (अ) येथे देशी दारूची चढ्या दराने विक्री होत आहे. या दारूमुळे शेतकरी, शेतमजूर, तरुण पिढीतील युवकही व्यसनाधीन बनत चालले आहेत. दारू पीत असल्याने घराघरांत सतत भांडणे व हाणामारीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ही दारू विक्री बंद करावी, असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर दारू विक्री बंदी महिला मंडळाच्या उषाबाई वाघ, सुशीलाबाई कांबळे, अनिताबाई सोनवणे, रेखाबाई सोनवणे, वंदनाबाई वाघ, सुनीताबाई इंगळे आदी उपस्थित होते.