आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलूत तूर, कापूस खरेदी बंदीचा विक्रम, 13 मार्चपर्यंत कापूस बंद ठेवण्याचा निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलू - तालुक्यात मागील दोन दिवसांपासून बारदाना नसल्याने भारतीय खाद्य निगमने शासकीय तूर खरेदी केंद्र बंद ठेवले आहे, तर जिनिंगमध्ये कापूस ठेवण्यासाठी जागा नसल्याचे कारण सांगून शहरातील कापूस खरेदीदारांनी दोन दिवसांपासून कापूस खरेदी बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होताना दिसत आहे.  

शासनाने सेलूत भारतीय खाद्य निगमचे तूर खरेदी केंद्र सुरू केले आहे. तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांनी शासकीय तूर खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी गर्दी केली. शासकीय तूर खरेदी केंद्रावरील तक्रारी दिवसेंदिवस वाढत गेल्या. अनेक वेळा तूर खरेदी केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे अचानकपणे खरेदी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या पटीत वाढली आणि तूर खरेदी केंद्रावर दररोज गोंधळ होऊ लागला. कधी गोडाऊन नाही म्हणून, तर कधी बारदाना नाही म्हणून खरेदी केंद्र बंद राहू लागले. गुरुवारी (दि. नऊ) पुन्हा एकदा तूर खरेदी केंद्र बारदान्याअभावी बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय झाला. आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाला सामोरे जावे लागले. शासनाने तत्काळ खासगी गोडाऊन ताब्यात घेऊन बारदाना उपलब्ध करून शेतकऱ्यांजवळील संपूर्ण तूर खरेदी करेपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचे सूचित केले. मात्र, असे असताना स्थानिक यंत्रणा शासकीय व निम्न शासकीय यंत्रणेने शासनाचे आदेश पायदळी तुडवत तूर खरेदी केंद्र वारंवार बंद ठेवताना दिसत आहेत.  
 
कापूस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. येथील कापूस यार्ड परिसरात ८ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या कापसाला फरदड म्हणत ४१०० ते४३०० प्रति क्विंटल भाव देण्यात आला. ७ मार्च रोजी शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल जास्तीत जास्त ५८०० रुपयांपर्यंतचा भाव मिळाला होता. 
 
१३ मार्चपर्यंत कापूस बंद ठेवण्याचा निर्णय
एकाच रात्रीतून असे काय घडले की शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल एक ते दीड हजार कमी भाव मिळू लागला. कापूस खरेदीदारांच्या हुकूमशाहीच्या विरोधात बुधवारी शेतकऱ्यांनी आवाज उठवला. कापूस यार्ड परिसरात खरेदी बंद पाडून योग्य भाव मिळण्यासाठी आग्रह धरला. एवढेच नव्हे, तर अांदोलनाचा इशारा दिला. तरीही जिनिंगमध्ये कापूस ठेवण्यासाठी जागा नाही, असे कारण दाखवत १३ मार्चपर्यंत कापूस बंद ठेवण्याचा निर्णय कापूस खरेदीदार व बाजार समितीने जाहीर केला आहे.
बातम्या आणखी आहेत...