आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड : बँकेच्या शाखेसह ८ दुकाने फोडली, दोन चोरांचा धुमाकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तलवाडा - गेवराई तालुक्यातील तलवाडा येथे दोन चोरांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह गावांतील आठ दुकानांचे शटर तोडून चोरी केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. दरम्यान, चोरांचा धुमाकूळ मोबाइल शॉपीवरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मात्र, ग्रामस्थांनी चोरीची तक्रार पोलिस ठाण्यात दिली नाही.

तलवाडा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा असून शनिवारी मध्यरात्री चोरांनी या बँकेच्या शाखेचे शटर तोडले. बँकेत प्रवेश केल्यांनतर तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु ती उघडलीच नाही. त्यांनतर चोरांनी आपला मोर्चा गावातील डॉ.आंबेडकर चौक व बाजार तळ परिसरात वळवला. येथील पान टपरी, मोबाइल शाॅपी, सायकल मार्ट, सलून सेंटर या दुकानांचे शटर तोडले.
जवळपास २० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला आहे. गेवराई तालुक्यातील तलवाडा गावात चोरांनी घातलेला धुमाकूळ गावातील कोहिनूर मोबाइल शॉपीवरील सीसीटीव्हीत मध्यरात्री २.१० मिनिटांनी कैद झाल्याचे उघड झाले आहे.
कॅश वाचली : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची तलवाडा येथे शाखा असून शनिवारी मध्यरात्री चोरांनी या शाखेत प्रवेश करून तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरांना तिजोरी उघडता न आल्याने बँकेतील रक्कम वाचली आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दिली नाही
तलवाडा गावात या पूर्वी दोन वेळा चोरीच्या अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत.परंतु पोलिसांनी त्याचा तपास लावला नाही. त्यामुळे शनिवारी पहाटे घडलेल्या चोरीची तक्रार ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात दिली नाही.
बातम्या आणखी आहेत...