आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एसबीआय’ समूहातील पाच सहयोगी बँकांचा विलीनीकरणास विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- ‘एसबीआय’ समूहातील पाच सहयोगी बँकांचे भारतीय स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याच्या निषेधार्थ देशभरातील 70 हजार अधिकारी, कर्मचारी 30 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहेत. लातुरातील कर्मचारी येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या क्षेत्रीय कार्यालयासमोर धरणे देणार आहेत.

स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टाफ असोसिएशन या राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. विलीनीकरण होत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आíथकदृष्ट्या प्रचंड नफ्यात आहेत. एकट्या स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या देशभरात 2 लाख 10 हजार कोटींच्या ठेवी आणि कर्जाचा व्यवहार आहे, तरीही या बँकांना गिळंकृत करण्याचा डाव सरकारने रचल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

लवकरच स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर व अन्य एका बँकेचे विलीनीकरण करण्याचा डाव असल्याचे संघटनेकडून सांगितले जात आहे.


सेवेचा बोजवारा उडेल
पाच बँकांचे विलीनीकरण करून एकच मोठी बँक करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यातून एसबीआय मोठी होईल पण मजबूत होणार नाही. सध्या लोकांकडे पर्याय आहेत. त्यातून बँकांची स्पर्धाही आहे. त्यामुळे ग्राहकांचा फायदा आहे. कॉ. प्रशांत धामणगावकर, सहसचिव, स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टाफ असो.


कशासाठी विरोध?
अद्याप देशातील 50 टक्केही लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचली नाही. त्यात या बँकांचे विलीनीकरण म्हणजे जनतेची गैरसोय होणार असल्याचा युक्तिवादही केला जात आहे. शिवाय बँकिंग क्षेत्रातील नोकरीचा टक्का कमी होण्याची भीतीही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचा विलीनीकरणाला विरोध आहे.