आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेचा सायरन वाजताच दरोडेखोरांच्या मुसक्या पोलिसांनी करकचून आवळल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- किल्लारी येथे उस्मानाबाद जनता सहकारी बँक लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघा दरोडेखोरांना पोलिसांनी सोमवारी पहाटे मोठ्या शिताफीने पकडले. दरोडेखोर हे सराईत गुन्हेगार असून राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. सुरेश काशीनाथ उमक (५२, कमळापूर, जि. यवतमाळ), गजानन सुखदेव राठोड (२५, नांदगाव, जि. यवतमाळ), दिलीप उत्तम नाडे (४०, नेताजीनगर, यवतमाळ), संकेत सुधाकर भोयर (१९, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत.
किल्लारी सहकारी साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर लातूर-उमरगा रस्त्यावर उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची शाखा आहे. सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास या बँकेवर दरोडा टाकण्यासाठी चार दरोडेखोर कारने आले. त्यातील एक जण बाहेर टेहळणीसाठी थांबला, तर एक कारमध्ये सज्ज होता. दोघांनी बँकेत घुसखोरी केली.
तिजोरीजवळ येताच सायरन वाजू लागल्याने त्या परिसरात असलेले पोलिस कर्मचारी व पहारेकरी सजग झाले. त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या दिलीप उत्तम नाडे याला मध्यरात्री २.५० वाजता पकडले. तथापि, बँकेत गेलेले त्याचे दोन साथीदार आणि कारमधील एक जण असे तिघे फरार झाले. याची माहिती पोलिस ठाण्याला देण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक गणेश किंद्रे हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पकडलेल्या दिलीपला हिसका दाखवला व त्याच्या मोबाइलवरून सहकाऱ्यांना काम फत्ते झाले असून कारखान्यानजीक असलेल्या पुलाजवळ कार घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान, पोलिस निरीक्षक किंद्रे व त्यांचे सहकारी पुलाच्या आसपास दबा धरून बसले. निरोेप मिळताच कार आली व दबा धरून बसलेले पोलिस हँड्सअप म्हणत समोर आले. चलाखी करशील तर गोळ्या घालू, असा इशाराही त्यांनी दराेडेखोराला दिला. त्यामुळे गजानन सकाळी ८.३० वाजता चूपचाप शरण आला.
त्यानंतर पोलिसांनी दोन टीम केल्या व दिलीपला एकासोबत, तर गजाननला अन्य टीमसोबत पाठवले. त्या वेळी रोडवर दोन व्यक्ती जात असलेल्या दिसल्या. पोलिसांनी दिलीपला त्यांच्याबद्दल विचारले असता त्याने तेच त्याचे साथीदार असल्याचे सांगितले. संशय येऊ नये म्हणून गाडी भरधाव पुढे नेण्यात आली व त्यानंतर विरुद्ध दिशेने येऊन दरोडेखोरांसमोर थांबली व संकेत सुधाकर भोयर व सुरेश काशीनाथ उमक सकाळी ११.४५ वाजता गळाला लागले. पोलिसांनी अतिशय नियोजन पद्धतीने ही कारवाई फत्ते केली. त्यांचे याबद्दल कौतुक होत आहे.
सराईत गुन्हेगार
दरोडेखोर हे अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील असून ते सराईत गुन्हेगार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी त्यांनी चोऱ्या केल्या आहेत. एटीएम फोडणे, बँकांवर दरोेडे टाकणे अशी त्यांची पार्श्वभूमी आहे. कानपूर बँकेवरही दरोडा टाकल्याचे ते सांगतात. साधारण ६० ते ७० गुन्हे त्यांच्या हातून झाले असावेत. चौकशीत सारे कळेल.
गणेश किंद्रे, पोलिस निरीक्षक
असे पकडले आरोपी
रात्री २.५०- घटनास्थळी दिलीप उत्तम नाडे हा बँकेच्या परिसरात लक्ष ठेवून होता. सायरन वाजताच पोलिसांनी त्याला पकडले.
सकाळी ८.३०- गजाननला पकडले.
सकाळी ११.४५- संकेत सुधाकर भोयर व सुरेश काशीनाथ उमक सकाळी ११.४५ वाजता गळाला लागले.
चार तासांनी उघडले तोंड
विश्वासात घेऊनही दिलीप पोलिसांना माहिती सांगत नव्हता. त्याच्या चौकशीत बराच वेळ गेला. रात्री २.५० वाजता पकडलेल्या दिलीपला तोंड उघडण्यासाठी सकाळचे साडेसात वाजले. पोलिसी हिसक्यापुढे त्याने पोपटासारखे बोलत साथीदारांची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी एकाला आणि कालांतराने दोघाला पकडले.
पुढील स्‍लाइ्ड्समधून पाहा, कसे पकडले आरोपी...