आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक बिघाड; वैजापुरात बँकांचे व्यवहार दोन दिवसांपासून ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - दूरध्वनीच्या ओएफसी वाहिनी तुटल्याने लीजलाइनवर इंटरनेटद्वारे कनेक्ट राहणा-या तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवहार गेल्या दोन दिवसांपासून रडतखडत सुरू आहे. मंगळवारी बँकेतून पैसे मिळू न शकल्याने अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पाणी फिरल्या गेल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मंगळवारी दिवसभर बँकांचे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प पडले होते. तर दुसरीकडे मंगळवारपासून बीएसएनएलचे अधिकारी व कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर गेल्याने हा खोळंबा गुरुवारी दूर होण्याची शक्यता आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीमध्ये सोमवारी दुपारी तांत्रिक अडचण निर्माण झाली. मंगळवारीदेखील हा बिघाड कायम असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांचे ऑनलाइन व्यवहार ठप्प होते.

तात्पुरता बिघाड असून तो दूर होईल या आशेवर काही नागरिकांनी दुपारच्या सत्रानंतर बँकेत विचारपूस केली असता व्यवहार सुरू झाले नव्हते. मंगळवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीचे नियोजन नागरिकांनी केले होते. त्यामुळे मंगळवारी खरेदीसाठी सकाळपासूनच नागरिकांनी पैसे काढण्यासाठी बँकेत धाव घेतली. मात्र दुस-या दिवशीही कनेक्टिव्हिटीची समस्या दूरू झालेली नव्हती. त्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच व्यवहार सुरू झाले नव्हते. बँकेत रोख जमा करणे, रोख काढणे, ट्रान्सफर करण्यासह इतर सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. या बिघाडामुळे शहरातील भारतीय स्टेट बँक, हैदराबाद स्टेट बँक, महाराष्ट्र बँक या सरकारी बँकासह काही खासगी बँकांमधील कामकाज दिवसभर बंद होते. यामुळे लाखो रुपयांचा व्यवहार होऊ शकला नाही. एटीएमसुद्धा बंद पडल्याने खातेधारकांची चांगलीच अडचण झाली.

तांत्रिक बिघाड
यासंदर्भात हैदराबाद बँकेचे शाखा व्यवस्थापक रूपचंद नंदागवळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लासूर स्टेशनजवळ बीएसएनएलच्या ओफसी केबल ब्रेक झाली आहे. त्यामुळे आमची लीजलाइनला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने यंत्रणा ठप्प झाली आहे. आम्ही आमच्या परीने यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.