आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागात बँका करणार कॅशलेस व्यवहारासाठी मेळाव्यातून जनजागृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - चलन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी जिल्ह्यातील बँकांना आर्थिक साक्षरता मेळाव्यातून कॅशलेस व्यवहारासाठी लोकांत जनजागृती करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार १३ डिसंेबरनंतर ग्रामीण भागात आयाेजित केल्या जाणाऱ्या मेळाव्यातून जनजागृती केली जाणार आहे.

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसाठी आयोजित कॅशलेस व्यवहाराबाबतच्या कार्यशाळेत जिल्हाधिकारी पोले बोलत होते. या वेळी जिल्हा अग्रणी बँक अधिकारी अरुण महाजन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए.जी.एम. ध्रुव बल आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पोले म्हणाले की, कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांनी कॅशलेस व्यवहारांची माहिती घ्यावी व आपल्या अधीनस्थ अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही दैनंदिन व्यवहार करण्याबाबतचे मार्गदर्शन द्यावे.

या वेळ एसबीआयचे वरिष्ठ अधिकारी बल यांनी कॅशलेस व्यवहाराकरिता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. त्यात स्वाइप मशीन, इंटरनेट बँकिंग, अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंट्री सर्व्हिस डेटा, कार्डस, ई-वॉलेट, युनिफाइड पेमेंट इंटरफेस आदीचा समावेश हाेता. तसेच वापरण्याच्या पद्धती सांगून सदरचा कॅशलेस व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हजार व पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी आल्याने बाजारात लहान नोटांचा तुटवडा आहे. तसेच कंेद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे पूर्वीच्या नोटांच्या तुलनेत कमी नोटा चलनात आणल्या जाणार आहेत. त्यामुळे कॅशलेस व्यवहार करणे अनिवार्य झाले आहे.
असे करा कॅशलेस व्यवहार
१) कार्ड््स, पीओएस : जास्तीत जास्त ठिकाणी डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे खर्चाच्या देयकांची पूर्तता करू शकता.

वापर : कार्ड स्वाइप करून पासवर्ड टाका. खर्चाच्या पूर्ततेबद्दलची पावती प्राप्त करून घ्या. बिलाचे पैसे अदा आणि या कार्डद्वारे ऑनलाइन खरेदीची बिलेदेखील देता येऊ शकतात.

२) ई-वॉलेट : ई-वॉलेट म्हणजे ई-बटवा. यातून विनाकागदी चलन, पैशाची देवाण-घेवाण करणे शक्य आहे.

वापर : पाकीट, बटवा डाऊनलोड केल्यानंतर आपला मोबाइल नंबर टाकून नोंदणी करावी. आपला डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड अगर नेट बँकिंगला त्याच्याशी जोडावे. त्यानंतर आपला मोबाइल फोनच आपला बटवा, पाकीट म्हणून वापरता येईल.

३) युनिफाइड पेमेंट इंटरफेस ( यूपीआय): प्रत्येक बँकेचे स्वत:चे मोबाइल ॲप आहे. ज्याद्वारे स्मार्टफोनमधून पैशांची देवाण-घेवाण करणे सहज शक्य आहे.

वापर :
स्मार्टफोन मोबाइलचा क्रमांक बँकेमध्ये किंवा एटीएममध्ये नोंदणी केल्यानंतर आपल्या स्मार्ट फोनमध्ये यूपीआय ॲप डाऊनलोड करा. त्यामध्ये आपला युनिक आयडी तयार करा. युनिक आयडीचा गोपनीय पासवर्ड पिन तयार करा. त्यामुळे आपण कोठूनही पैशाची देवाणघेवाण करू शकतात.

४) अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंट्री सर्व्हिस डेटा (यूएसएसडी) : स्मार्टफोनव्यतिरिक्त साधारण फीचर फोनद्वारेही पैशाची देवाणघेवाण शक्य आहे.

वापर: आपल्या मोबाइलचा क्रमांक आपल्या बँक खात्याशी नोंदणी करून घ्या. त्यानंतर आपल्या मोबाइलहून *99# डायल करा. आपल्या बँकेच्या शॉर्ट नावाच्या आधी ३ हा आकडा किंवा बँकेच्या आयएफएससीच्या आधी ४ हा आकडा टाकावा. त्यानंतर Fund Transfer -MMID हा पर्याय निवडून ज्यांना यांनी पैशाची पूर्तता करावयाची आहे त्यांचा मोबाइल क्रमांक आणि MMID टाकावा. त्यानंतर अदा करावयाची रक्कम आणि आपला MPIN टाकून स्पेस देऊन बँक खात्याच्या क्रमांकातील शेवटचे ४ अंक टाकावेत. त्यानंतर तुमच्या बिलाचे पैसे अदा हाेतील.
बातम्या आणखी आहेत...