आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समितीच्या माजी सभापतीला घातली अांघोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- पाऊस पडत नसल्यामुळे दांडेगाव (ता. भूम) येथील महिलांनी पंचायत समितीचे माजी सभापती अण्णासाहेब भोगिल यांना आंघोळ घालून भिजवले. पाऊस पडण्यासाठी गावात असा प्रकार करण्याची प्रथा आहे.
भूम तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मृग नक्षत्रात काही प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. मात्र, नंतर पावसाने दडी मारल्यामुळे पिकेही संकटात आहेत. यामुळे दांडेगाव येथील ८० ते १०० महिलांनी आपल्या गावातील जुनी परंपरा जोपासत गावातील सर्व मंदिरांमध्ये बुधवारी (दि. १) अभिषेक केला. त्यानंतर गावातील ज्येष्ठ नागरिकांनाही आंघोळ घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. महिलांनी थेट भोगिल यांना गाठले. त्यांनी भोगिल यांना तेथेच आंघोळ घातली. तसेच उपसरपंच बबन भोगिल यांनाही आंघोळ घालण्यात आली.
गावातील जुनी परंपरा
पावसासाठी साकडे घालण्यासाठी मंदिरात अभिषेक करण्याची प्रथा आहे. ही प्रथा सर्वत्र आढळते. मात्र, दांडेगाव येथे प्रतिष्ठित नागरिकांनाच आंघोळ घालण्याची प्रथा आहे. यामुळे गावातील महिलांनी भोगिल यांना आंघोळ घातली आहे. अशी प्रथा पाळल्याने पाऊस पडतो, अशी नागरिकांची श्रद्धा आहे.