आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीच्या अंगावर बॅटरीचे अँसिड फेकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- जाचास कंटाळून पत्नी माहेरी निघून गेली. तेथे जाऊन पतीने ती झोपेत असताना घरातील मोटारीच्या बॅटरीचे अँसिड फेकून तिला जखमी केले. हा प्रकार मौजे आईनवाडी (ता.पालम) येथे घडला. याप्रकरणी जखमी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरुद्ध पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पतीस पोलिसांनी अटक केली आहे.

पेठशिवणी येथील मंचक कोंडिबा पवार हा पत्नी उषाचा (30) सातत्याने छळ करीत होता. या प्रकारास कंटाळून उषा तीन महिन्यांपासून माहेरी आईनवाडी येथे राहावयास गेली होती. 30 मे रोजी पती मंचक पवार आईनवाडी येथे गेला. त्याने तिला घरी येण्याचे सांगितले. तिने त्यास विरोध केला. त्यामुळे त्याने अँसिड हल्ला केला. त्यात ती गंभीर जखमी झाली.