आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beat To Nanded Government Hospital Doctor And Nurse

नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सला बेदम मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड-शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वाॅर्ड क्र. १२ मध्ये मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमाराला रुग्णाच्या ५-६ नातेवाइकांनी निवासी डॉक्टर परिचारिकांना मारहाण केल्यामुळे तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर रुग्णालयातील डॉक्टर परिचारिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. घटनेनंतर सायंकाळपर्यंत डॉक्टर परिचारिकांनी काम बंद आंदोलन केल्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली.

वाॅर्ड क्र. १२ मध्ये खुदबईनगरातील अब्दुल सलीम अब्दुल खादिर हा रुग्ण सोमवारी उपचारासाठी दाखल झाला. दुपारी निवासी डॉक्टर सचिन भटकर, परिचारिका सुहासिनी विंटेज यांनी त्याची तपासणी करून सलाइन लावले. सलाइन लावण्यावरून वाद झाल्यामुळे रुग्णाच्या चार-पाच नातेवाइकांनी डॉक्टर परिचारिकेला मारहाण केली. या मारहाणीत डॉ. भटकर यांच्या गालाला, दाताला दुखापत झाली. हे भांडण सोडवण्यासाठी इतर परिचारिका बाजूच्या रुग्णाचे नातेवाईक आले असता त्यांनाही मारहाण झाली.
घटनेनंतर दुपारी वाजेपासून डॉक्टर परिचारिकांनी रुग्णालयासमोरील रस्त्यावर ठिय्या मारून घोषणाबाजी केली. त्यामुळे गांधी पुतळा ते शिवाजी पुतळा मार्गावरील वाहतूक तास-दीड तास विस्कळीत झाली. अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर यांनीही आंदोलनस्थळी येऊन डॉक्टरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्या सर्व डॉक्टर, परिचारिकांना वजिराबाद पोलिस ठाण्यात नेले. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.
याप्रकरणी पोलिसांनी सायंकाळी जणांना ताब्यात घेतले. दोन्ही बाजूंच्या तक्रारी आल्या असून प्रकरणाची शहानिशा करून योग्य कारवाई केली जाईल, असे पोलिस निरीक्षक रघुनाथ कदम यांनी सांगितले.

आरोग्यसेवा विस्कळीत
मारहाणीच्याघटनेनंतर डॉक्टर परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे रुग्णालयातील आरोग्यसेवा विस्कळीत झाली. अधिष्ठाता डॉ. दिलीप म्हैसेकर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय. एस. चव्हाण यांनी निवासी डॉक्टर परिचारिकांची बैठक काढून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार वाढत आहेत. डॉक्टर परिचारिकांना पुरेशी सुरक्षा व्यवस्था नाही. रुग्णालयात पुरेशी सुरक्षा व्यवस्था करावी, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे मार्डचे अध्यक्ष डॉ. चंद्रहास काळे यांनी सांगितले.