आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाई कडकडीत बंदच्या काळातही शिवप्रेमींनी घालून दिला आदर्श, बस फोडण्याऐवजी दिला धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई (बीड)- छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या माथेफिरूस कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी आज (मंगळवारी) अंबाजोगाईत कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व जातीधर्मातील शिवप्रेमी नागरिकांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला निषेध व्यक्त केला.

शहरातून सकाळी पायी रॅली काढून सर्व व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना बंद ठेवण्याबाबत आवाहन करण्यात आले. रॅलीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध समाजातील नागरीकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यावेळी, माथेफिरू विठ्ठल तिडके यांस कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. शिवप्रेमींच्या आवाहनास प्रतिसाद देत अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांनी आणि हॉटेलचालकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. आजच्या मंगळवारच्या बाजारानिमित्त येणाऱ्या शेतकरी बांधवांना बंदमधून वगळण्यात आले होते.

बस फोडण्याऐवजी दिला धक्का..
अंबाजोगाईतील शिवप्रेमी युवक बंदचे आवाहन करीत असताना त्यांना शिवाजी चौकात एक बस बंद पडलेली दिसली. यावेळी रॅलीतील तरूणांनी त्या बसला धक्का मारून ती सुरू करून दिली. दरम्यान, बंदच्या काळात बसच्या काचा फोडल्या जातात, परंतु अंबाजोगाईतील शिवप्रेमींनी मात्र अशा विध्वंसक कृत्यांना फाटा देत उलटपक्षी बसचालकाची मदत करून अनोखा आदर्श घालून दिला.

पुढील स्लाइडवर वाचा... बीडमध्ये 14 ठिकाणी दगडफेक; 3 बस फोडल्या, मराठा नेत्यांची दिलगिरी...
बातम्या आणखी आहेत...