आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - लोकसभा निवडणुकीत विरोधात प्रचार का केला, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. तालुक्यात खांडेपारगाव येथे शुक्रवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात गोरख आमटे याच्या उजव्या हाताची तीन बोटे तुटली. त्याला औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.

खांडेपारगावातील राजेंद्र आमटे संजय आमटे यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. शुक्रवारी भाजपचे राजेंद्र आमटे गोरख आमटे हे गावातील एका किराणा दुकानाजवळ बोलत होते. तेव्हा राष्ट्रवादीचे संजय आमटेंसह प्रदीप आमटे, अमोल आमटे, दादा आमटे तेथे आले. वाद घालत त्यांनी राजेंद्र गोरख यांच्यावर हल्ला केला. यात दोघेही जखमी झाले.