आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संस्थाचालकाचा शिक्षकाला चावा, बीडमध्ये तुंबळ हाणामारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - रुख्माई गोविंद मतिमंद निवासी विद्यालयाचे संस्थाचालक शिक्षकात पंचायत समितीसमोर सकाळी सव्वादहा वाजता हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात परस्पराविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.संस्थाचालक शिवाजी चव्हाण यांनी बोटाला चावा घेतल्याने शिक्षक गोपीनाथ काळकुटेंना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवदरा येथील रुख्माई गोविंद मतिमंद निवासी विद्यालयाचे शिक्षक गोपीनाथ यादवराव काळकुटे यांच्या वडिलांचे निधन झाल्याने २२ डिसेंबर २०१४ ते २४ डिसेंबरपर्यंत शाळेत गैरहजर राहिले. शाळेत जाऊन त्यांनी रजेचा अर्ज दिला. तेथे संस्थाचालक प्रभारी मुख्याध्यापकांनी अर्जाचा स्वीकार करता काळकुटे यांना गैरहजर दाखवले. त्यांचा जानेवारीचा पगारच मिळाला नाही. मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजता संस्थाचालक चव्हाण हे पंचायत समितीसमोर असताना शिक्षक काळकुटे यांच्यासह गोरख डिसले, शाहू चांदणे, सिद्धेश्वर वाघमोडे, संजय राठोड, बाळू ताटे हे तेथे गेले. त्या वेळी शिक्षकांनी आमचा पगार द्या, आम्हाला हजर करून घ्या, अशी मागणी केली.

तेव्हा संस्थाचालक चव्हाण यांच्यासह बरोबर असलेले सुरेश धनवटे, विठ्ठल मस्के यांनीही शिक्षकांना मारहाण केली. याप्रकरणी काळकुटे यांनी शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीत सविस्तर कथन केले आहे. या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही.

आणखी एक तक्रार
बुधवारीसायंकाळी साडेसहा वाजता रुख्माई गोविंद विद्यालयाचे शिक्षक राजेश्वर शिवाजीराव पाटील हे त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना अंबिका चौकात गाठून विठ्ठल मस्के बबन चव्हाण यांच्यासह अन्य एकाने मारहाण केली असून याप्रकरणी राजेश्वर पाटील यांनी रात्री शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, जिल्हािधकार्‍यांनी रुख्माई गोविंद निवासी मूकबधिर मतिमंद विद्यालयाच्या तपासणीसाठी नेमलेल्या शिक्षण विभागाच्या समितीने फक्त एकदाच भेट देऊन तपास केलेला आहे. अद्याप तपासणीला सुरुवात नाही. त्यामुळे विद्यालयातील सत्य बाहेर आले नाही.

शिक्षकांकडून मारहाण
संस्थाचालकशिवाजी गोविंदराव चव्हाण यांनी शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शाळेत गैरहजर असलेले गोपीनाथ काळकुटे, लहू चांदणे, अजीम पठाण, सुभाष निर्मळ, गोरख डिसले, विजय बनसोडे, मनोहर करांडे, गणेश शिंदे, मेघा शिंदे, नागेश्वर पाटील, संजय राठोड, रंजित खाडे, रणजित जाधव, राहुल शिंदे, अशोक माळी, रामकिसन गर्कळ, बाळू ताटे, हे कर्मचारी फेब्रुवारी २०१५ पर्यंत गैरहजर असून मंगळवारी पंचायत समितीसमोर मी आलो असता सर्वांनी आमचा पगार का काढला नाही म्हणून िशवीगाळ केली. यातील गोपीनाथ काळकुटे संजय राठोड यांनी मारहाण केली आहे.

प्रकरण काय‌?
रुख्माई गोविंद मूकबधिर मतिमंद निवासी या दोन्ही विद्यालयांतील २२ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संस्थासचिव शिवाजी चव्हाण प्रभारी मुख्याध्यापकाच्या दहशतीला कंटाळून जानेवारी २०१५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. जानेवारी रोजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस.एस.शेळके यांनी कारवाईचे पत्र दिल्यानंतर शिक्षकांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर शिक्षक विद्यालयात रुजू होण्यासाठी गेले असता त्यांना संस्थाचालकांनी रुजूच करून घेतले नाही. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एक त्रयस्थ तीनसदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीने विद्यालयाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले आहेत. शिक्षकांना विद्यालयात रुजू करून घेतले जात नसल्याने शिक्षक विरुद्ध संस्थाचालक, असा वाद चिघळत आहे.

दोन्ही गटांच्या १३ जणांवर गुन्हे दाखल
संस्थाचालक शिक्षकांनी शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटांतील तेरा जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून लवकरच पोलिसांकडून अटक करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी दोन्ही गटांच्या लोकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या परिसरात एकच गर्दी केली होती.

(फोटो : शिवाजीनगर पोलिस ठाण्यात संस्थाचालक शिक्षकांच्या गटाने केलेली गर्दी.)