आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीचे आमिष दाखवून 14 जणांना गंडा, बिडमध्‍ये गुन्‍हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नोकरीचे अामिष दाखवून बेरोजगार तरुणांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या महाठगाचा भंडाफोड झाला असून चौदा जणांकडून २४ लाख २० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व कोशाध्यक्ष अशा चौघांविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

बीड शहरातील बालेपीर भागामधील ग्रामसेवक कॉलनीसमोर स्व. मजिद खान साहेब मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयात अध्यक्ष इम्तियाज अहेमद मजिद खान (रा. रोशनपुरा, बीड) व उपाध्यक्ष, सचिव आणि कोशाध्यक्ष यांनी याच भागातील अनेक तरुणांना ट्रस्टमध्ये नोकरीला लावतो, म्हणून त्यांच्याकडून २० जून ते २० नोव्हेंबर २०१५ या कालावधीत लाखो रुपयांची रक्कम घेतली.
बालेपीर भागातीलच अमजद गौरअली पठाण (वय ३६) यास ट्रस्टमध्ये चालक म्हणून त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये घेतले गेले. यानंतर इसाक जैनोद्दीन शेख यांच्याकडून पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर एक गाळा खरेदी करून देतो म्हणून १० लाख रुपये, शेख ताजोद्दीन शेख इमाम यांच्याकडून जावयास परळी थर्मलमध्ये नोकरीला लावतो म्हणून २ लाख रुपये घेतले. बेग इम्रान मुबारक, शेख रिझवान शेख अनिस यांच्याकडूनही नोकरीला लावतो म्हणून एक लाख रुपये उकळले. रईस नूर मोहंमद पठाण यांनाही ट्रस्टमध्ये फिल्ड वर्कर म्हणून घेतो, असे म्हणून ५० हजार रुपयांना गंडवले. शेख अकबर शेख मोहिमोद्दीन यांच्या पुतण्याला लातूर येथे, तर मुलाला ट्रस्टमध्ये नोकरीला लावतो म्हणून ३ लाख रुपये घेतले. शेख वसीम अब्दुल रज्जाक यांच्याकडून दीड लाख रुपये घेऊन बीड नगरपालिकेत शिपाई पदावर नोकरी लावण्याचे अामिष दाखवले. सय्यद वाजेद, सय्यद वाजेद, शेख खमर, शेख रियाजुद्दीन, शेख नजीम, शेख खलिलोद्दीन, शेख खुर्शीद बागवान यांच्याकडून अनुक्रमे १ लाख, १ लाख, दीड लाख, ५० हजार, १ लाख, २० हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला.