आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परळीत पिस्टल घेऊन फिरणारा अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - नगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत परळी शहरात पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले. याप्रकरणी त्याच्याविरोधात परळी शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
परळी शहरात पिस्टल घेऊन तरुण फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी पथकासह छापा मारून शहरातील शिवाजी चौक परिसरातील शिवनेरी पान सेंटरजवळ सतीश भगवान फड (२९, रा. कन्हेरवाडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे रिकामे मॅगझिन असलेले विदेशी बनावटीचे पिस्टल आढळून आले असून त्याची २५ हजार रुपये किंमत आहे. याप्रकरणी शिवाजी गुरमे यांनी शहर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सतीश फड याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. खाडे करत आहेत. पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, भास्कर केंद्रे, तुळशीराम जगताप, मुंजाबा कुव्हारे, नरेंद्र बांगर, मनोज वाघ यांनी कारवाई केली.
बातम्या आणखी आहेत...