आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये दलित समाजाची वज्रमूठ; चार लाख दलित बांधवांचा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करा, बलात्कारी कोणीही असोत फाशी झालीच पाहिजे या मागण्यांसाठी शनिवारी दुपारी दोन वाजता बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर चार लाख दलित बांधवांचा मूकमोर्चा धडकला. शिस्तीत निघालेल्या या मोर्चात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक होती. राज्यात आयोजित करण्यात आलेल्या दलित ऐक्य मोर्चाची सुरुवातच पहिल्यांदा बीडमधून करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी ११ वाजता बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्ह्यातील अनुसूचित जाती- जमाती, भटके विमुक्त बांधव एकत्र येण्यास सुरुवात झाली. दुपारी १२.३० वाजेपर्यंत मैदानात तोबा गर्दी झाली होती. एकदम गर्दी होऊ नये म्हणून संयोजक व स्वयंसेवकांनी काळजी घेत जिल्ह्यातून आलेल्या महिला, मुली, लहान मुले, वृद्ध महिलांना जिल्हा स्टेडियममधून टप्प्याटप्याने मोर्चा मार्गाकडे सोडले. या माेर्चात मातंग, डीपीअाय, चर्मकार महासंघ, बीड जिल्हा लाेहार-गाडीलाेहार समाज विकास संघ, रिपाइं, बहुजन विकास मोर्चा, डॉ.आंबेडकर विकास मंच यांच्यासह जिल्ह्यातील अनेक संघटना आणि दलित एेक्य मोर्चा संयोजन समितीचे पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवक मोर्चोत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

२१ ऑक्टोबरला औरंगाबादेत मोर्चा : राज्यातील विविध जिल्ह्यांत दलित ऐक्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून औरंगाबादेत २१ ऑक्टोबर रोजी भव्य मोर्चा निघणार आहे.
बातम्या आणखी आहेत...