आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारागृहात वडिलांच्या भेटीसाठी आलेल्या मुलीवर बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्हा कारागृहात वडिलांना भेटण्यासाठी दुचाकीवर मेहुण्याबरोबर आलेल्या एकाने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास च-हाटा फाट्यावर घडली.
गेवराई तालुक्यातील रेवकी-देवकी येथील एक तरूणी नगर जिल्ह्यातील मोहटादेवी येथील तिच्या बहीणीकडे पारधीवस्तीवर राहत होती.तरूणीचे वडील खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत बीडच्या जिल्हा कारागृहात होते.त्यांना भेटण्यासाठी मेहूणा शंकर काळे व सचीन लबडे या दोघांसमवेत ती दुचाकीवर मंगळवारी दुपारी बीडला आली. कारागृहाच्या आत तरूणीला सोडल्यानंतर दोघे जण दारू पिण्यासाठी बाहेर गेले. वडीलांची भेट झाल्यानंतर तरूणी दोघांवर बरोबर दुचाकीवर बसली, दुचाकी पाथर्डीकडे नगररोडने जात असतांनाच वाटेत च-हाटा शिवारात दुचाकी लावुन तिच्यावर सचीन लबडे याने बलात्कार केला अशी तक्रार तरूणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिली असुन पोलिसांनी सचीन लबडे याला अटक केली आहे. शंकर काळे हा फरार आहे. पोलिसांनी तरूणीला मंगळवारी रात्री ठाण्यात थांबवुन बुधवारी सकाळी तिची जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली आहे
पुढील स्लाइडमध्ये वाचा, छळ असह्य झाल्याने विवाहितेची आत्महत्या