आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार : हंगामी वसतिगृहामुळेच मुलांचे स्थलांतर टळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जिल्ह्यातील थाेडेथाेडके नव्हे, तर तब्बल ४० हजार ८३८ ऊसतोड व मजुरांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृहे माेठे अाधारवड बनली अाहेत. शिवाय शिक्षण िवभागाच्या कामकाजालाही यशाचे काेंदण लागले अाहे. वसतिगृहातून मुलांचे शाळाबाह्य होण्याबरोबरच त्यांचे स्थलांतरही रोखण्याचे महत्त्वपूर्ण काम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या नावावर नाेंदले गेले असून त्याचे काैतुक थेट सांगलीच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत प्रधान सचिवांकडून जाहीरपणे करण्यात अाल्याने बीडची मानही उंचावली अाहे. आष्टी तालुक्यातील पारगाव केंद्रात सुरू असलेल्या "ज्ञानरचनावादी' कामाचाही काैतुकामध्ये विशेष उल्लेख प्रधान सचिव नंदकुमार यांनी केला अाहे.

चर्चासत्रात माहिती
सांगली येथे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमासंदर्भात २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चर्चासत्रात राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांसह विस्तार अधिकारी, डायटचे प्राचार्य असे ५०० अधिकारी सहभागी झाले होते. प्रधान सचिव नंदकुमार हे येथे सरुवातीचे दोन दिवस उपस्थित होते.
चर्चासत्रात सादरीकरण करण्याचा मराठवाड्यातून केवळ बीड जिल्ह्यालाच मान देण्यात आला होता. त्यामुळे सर्वांचे या प्रेझेंटेशनकडे लक्ष लागले होते. माध्यमिक शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांनी जिल्ह्यातील पारगाव केंद्रात सुरू झालेल्या ‘ज्ञानरचनावादी’ उपक्रमाचे सादरीकरण केले. यामध्ये पारगावच्या सर्व शाळांमध्ये कशा प्रकारे काम सुरू झाले आहे ते स्क्रीनवर "पीपीटी'च्या (पाॅवर पाइंट प्रेझेंटेशन) माध्यमातून समाेर ठेवले. या केंद्रातील प्रत्येक शाळा व प्रत्येक शिक्षक कर्मचाऱ्यांची तळमळ व काम त्यांनी मांडले. प्रत्येक शिक्षकाच्या कामाचा गौरव केला. या सादरीकरणाला प्रधान सचिवांनी "hats up to beed District' म्हणत दाद दिली, असे माध्यमिक िवभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल म्हणाल्याचे सांगण्यात आले.
राज्याचे प्रधान सचिव करणार शिक्षकांचा गौरव
राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी सांगलीतील मनोगतात पारगाव केंद्रातील मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षकांचे स्वागत केले. याशिवाय बीड जिल्ह्यात चांगले काम सुरू असून हा जिल्हा लवकरच राज्यात आघाडीवर राहील, अशी अाशाही त्यांनी व्यक्त केली. सीईअाे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) सर्व बीईअाे, विस्तार अधिकारी, शिक्षक यांच्या गाैरवासाठी जानेवारी अखेरीस येणार असल्याचे ते म्हणाले. "सरल' च्या सर्वोत्कृष्ट कामगिरीचाही त्यांनी उल्लेख केला व बीडकरांचे टाळ्या वाजवून स्वागत करावे, असेही नंदकुमार म्हणाले.
पाल्यांना केली विनंती
जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक व प्राथमिक विभाग व शिक्षकांनी गावात जावून ऊसतोड कामगारांच्या भेटी घेवून त्यांची जनजागृती करत शासनाच्या हंगामी वसतिगृहाची माहिती दिली. या शिवाय पालकांनी मुलांना त्यांच्या बरोबर उसतोडणीसाठी नेऊ नये यासाठी विनंती केली.
सामूहिक प्रयत्नांचे फलित
^जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती बजरंग सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश आम्ही मिळवू शकलो.
शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
आता जबाबदारी अिधक वाढली
गेवराई विस्तार अधिकारी काळम पाटील यांनी सादरीकरण केले. प्राथमिक उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, जमीर शेख व मेंढेकर यांनी स्थलांतर रोखण्यासाठी केलेले भरीव योगदान प्रभारी गटशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे व सोमनाथ वाळके यांनी ज्ञानरचनावाद पद्धतीतील केलेले कार्य या कामांची विशेष दखल घेतली गेली. अाता जबाबदारी अधिक वाढली असून स्वत:स झोकून देवून काम करावे लागेल.'' -एस. पी. जैस्वाल, प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक)