आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचे पॅकेज 70 कोटींपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - बीड जिल्ह्याला दुष्काळ निवारणासाठी दिलेले 27 कोटींचे पॅकेज 70 कोटींपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. कृषिमंत्र्यांनी सोमवारी गेवराई तालुक्यात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश हत्ते यांच्या गेवराई येथील निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी दुष्काळाबाबत चर्चा केली त्याप्रसंगी ते बोलत होते.
आमदार बदामराव पंडित, जिल्हा परिषदेचे सभापती युधाजित पंडित, अशोक हिंगे, नवनाथ थोटे आदी या वेळी उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले की जिल्ह्यातील पिके तर गेलीच, अनेक ठिकाणी फळबागा जळाल्या आहेत. दुष्काळी स्थितीची आपण पाहणी करत आहोत. जलसंधारणाची कामे व्हावीत, ही मागणी सर्वत्र होत आहे. याची नोंद घेऊन कामे सुरू करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिका-यांनी लक्ष घालावे. तीस टक्के रकमेची कामे कृषी विभागाने तातडीने सुरू करावीत, मजुरांच्या कामांवर मशीन वापरले जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या.