आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडच्या 35 महसूल मंडळांत अतिवृष्टी; शिवार तुडुंब, शहरातील मुख्य बसस्थानक पाण्याखाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करपरा नदी... - Divya Marathi
करपरा नदी...
औरंगाबाद / बीड - गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाचे मराठवाड्यात जोरदार आगमन झाले आहे. कधी नव्हे तो हवामान विभागाचा अंदाज आज खरा ठरल्याची प्रचिती आली. मराठवाड्यातील 32 तालुक्यांमध्ये अतीवृष्टी झाली आहे. त्यापैकी एकट्या बीडच्या 35 महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली असून येथील शेतांसह चक्क शहरातील मुख्य बस स्थानक सुद्धा पाण्याखाली गेले आहे.
 

गोदावरी, कृष्णा खोऱ्याअंतर्गत असलेल्या लघु, मध्यम प्रकल्पातही पाणीसाठा वाढला आहे. शनिवारी रात्रीपासून आज रविवारी सकाळपर्यंत संततधार पाऊस सुरू असून यामुळे नदी, नाले, तलावातील पाणी पातळीत काही अंशी वाढ झाली आहे.आता वार्षिक सरासरीच्या तुलनेत 49.15 टक्के पावसाची नोंद झाली आहे महत्त्वाचे हे की, कालच्या शनिवारपर्यंत सरासरीच्या 38 टक्के पाऊस जिल्ह्यात झाला होता. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा आधार मिळाला आहे.
 
 
गत दोन महिन्यांपासून पावसाचे प्रमाण अनिश्चित राहिले, त्यामुळे पावसाळ्यातही शेतकऱ्यांना दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागले, असे असताना आता बैलपोळा 1 दिवसावर आलेला असताना  सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे, एक रात्रीत पावसाने सारी स्थिती बदलून टाकली आहे.बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 63 पैकी 35 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यात बीड तालुक्यातील म्हाळसजवळा वगळता सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, पावसामुळे ग्रामीण भागात नद्यांना पाणी वाढले आहे.
 
 
पुणे वेधशाळेचा अंदाज यंदा प्रथमच खरा ठरला असून या पावसामुळे खरिपातील पिकांना आधार मिळाला आहे. बीड, पाटोदा,गेवराई, शिरूर, अंबाजोगाई आणि केज या 6 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.

अतिवृष्टी झालेली महसूल मंडळे
बीड 87.00 मि.मी.
राजुरी न. 66 
पेडगाव 78 मि.मी.
मांजरसुंबा 74 मि.मी.
चौसाळा 100 मि.मी
नेकनूर 70 मि.मी.
पिंपळनेर 74 मि.मी.
पाली 94 मि.मी.
लिंबागणेश 84 मि.मी.
------

पाटोदा 110 मि.मी.
थेरला 98 मि.मी.
अमळनेर 80 मि.मी.
दासखेड 102 मि.मी.
------

आष्टी 75 मि.मी.
कडा 68  मि.मी
धामणगाव 66 मि.मी.
टाकळसिंग 66 मि.मी.
------

गेवराई 97 मि.मी.
धोंडराई 82 मि.मी.
उमापूर 95 मि. मी.
जातेगाव 84 मि.मी.
---
शिरूर 83
 
रायमोह 76
तींतरवणी 87
-----
अंबाजोगाई 73
घाटनांदूर 90
लोखंडी सावरगाव 76
बर्दापूर 96
-----
विडा 65
ह.पिंपरी 76
बनसारोळा 66
नांदूरघाट 68 मि.मी.
-----
धारूर 67 मि.मी.
-----
परळी 92
सिरसाळा 68
-------
तालुकानिहाय झालेला पाऊस

बीड - 74.82 मि.मी, पाटोदा - 97.50, आष्टी - 62.86, गेवराई - 69.20, शिरूर का. - 82, वडवणी- 59, अंबाजोगाई - 75, माजलगाव - 51, केज - 65.86, धारूर - 57, परळी - 58.40
 
बातम्या आणखी आहेत...