आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड रुग्णालयात आरोपीचा मृत्यू

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - जिल्हा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीतील आरोपी प्रताप विष्णू कुटे याचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीयांनी आठ तास मृतदेह ताब्यात न घेतल्याने रुग्णालयाच्या परिसरामध्ये तणावाचे वातावरण झाले होते.
कुटेवाडी येथे 13 फेब्रुवारीला 2012 रोजी रात्री जुन्या भांडणावरून दोन गटांमध्ये तलवारीने मारहाण झाली होती. या प्रकरणी पिंपळनेर पोलिस ठाण्यात नवनाथ वैद्य यांच्या तक्रारीवरून बंडू वरपे, रामचंद्र वरपे, सुंदर कुटे, संजय कुटे, नंदू करपे, विष्णू कुटे, विष्णू बजगुडे, बाबू वरपे, आश्रुबा वरपे, प्रताप कुटे, दिनकर कुटे, दादा वरपे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. आरोपींना 16 जानेवारी 2012 रोजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर सर्व आरोपींची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली. यातील प्रताप कुटे याची प्रकृती बिघडल्याने त्यास 23 फेब्रुवारीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान 27 रोजी सकाळी 9.25 वाजता मृत्यू झाला. प्रतापचा मृत्यू तक्रारदार नवनाथ वैद्य, दोषी पोलिस, कारागृहातील अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे झाला असून त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा कुटुंबीयांनी पावित्रा घेतला. पोलिस उपअधीक्षक संभाजी कदम, उपअधीक्षक (गृह) व्ही.एम. काळे, पोलिस उपनिरीक्षक शाहीदखान पठाण, तहसीलदार प्रभोदय मुळे, नायब तहसीलदार अभय मस्के यांनी चौकशी करण्याचे अश्वासन कुटुंबीयांनी दिल्यानंतर सायंकाळी पाच वाजता मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
आठ तास मृतदेह ताब्यातच घेतला नाही
प्रताप कुटे याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला. या प्रकरणास कारागृहातील अधिकारीच जबाबदार आहेत. दोषींवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी कुटुंबीयांनी आठ तास मृतदेह ताब्यात घेतलाच नाही. सायंकाळी पाच वाजता कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला.