आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये मेडिकलच्या विद्यार्थिनीस ट्रकने चिरडले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - दुचाकीवरून महाविद्यालयाकडे जाणाºया भावी डॉक्टर युवतीस भरधाव ट्रकने चिरडल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता घडली. या अपघातात युवती जागीच ठार झाली असून ट्रक चालक फरार झाला आहे. नम्रता राजकुमार नाकेल (जैन) (वय 22) असे त्या युवतीचे नाव आहे. नम्रता सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक मेडिकल महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. ती दुचाकीवरून (एम.एच. 23 जे 8937) महाविद्यालयात जात असताना छत्रपती शिवाजी पुतळा चौकात भरधाव ट्रकने (जी.जे. 10 झेड 7635) धडक दिली. यात तिचा मृत्यू झाला.