आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधील दूध घाेटाळा; आयएएस अधिकाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बीड जिल्हा दूध उत्पादक संघातील अडीच कोटींच्या घाेटाळाप्रकरणी एका आयएएस अधिकाऱ्यांसह नऊ जणांवर मुंबई अार्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. कामगार आयुक्त यशवंत केरुरे (आयएएस), माजी आयएएस अधिकारी आर. डी. शिंदे व पाटोदा तालुका दूध उत्पादक संघाचे एमडी महादेव बांगर यांचा त्यात समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते रामकृष्ण बांगर हे या दूध संघाचे नेतृत्व करतात ते महानंदचेही संचालक अाहेत.

२०११ मध्ये दूध संघाने राष्ट्रीय राज्य सरकारकडे २ कोटी ४३ लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम २०११ व २०१३ दरम्यान आली. २०१३ मध्ये संघाने नवीन यंत्रे खरेदीसाठी पुण्यातील भाऊसाहेब जंजिरे यांच्या इन्फोटेक या कंपनीला १.२५ कोटी दिले. मात्र, २०१५ पर्यंत कंपनीने यंत्रे पुरवली नसल्याचे बीडच्या दूध संघातील अधिकाऱ्याने सांगितले. २००९ पासून संघाने लेखापरीक्षण केले नाही. त्यानंतर माजी दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी या भ्रष्टाचाराबाबत चौकशीचे आदेश दिले. ज्या वेळी संघाला निधी मंजूर करण्यात आला त्या वेळी शिंदे दूध आयुक्त होते. लेखापरीक्षण झाले नसल्याचे निदर्शनास आल्यानंतरही तत्कालीन दूध आयुक्त केरुरे यांनी याकडे डोळेझाक केली हाेती.
बातम्या आणखी आहेत...