आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beed Municipal Council Everyday Save 8 Lakh Liter Water

बीड नगरपालिकेकडून दररोज आठ लाख लिटर पाणीबचत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी शासन, प्रशासन नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण करून जलस्रोत बळकटीकरण करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. दुष्काळात पाण्यासाठी होरपळणा-याबीडकरांना पाण्याचे महत्त्वही एव्हाना चांगलेच कळाले आहे. त्यातून बीड पािलकेनेही जलशुद्धकीरण प्रकल्पातून स्वच्छतेसाठी वापरण्यात येणा-यापाण्याचा पुनर्वापर करण्यास सुरुवात केली असून यातून दररोज किमान ६ ते कमाल ८ लाख लिटर पाण्याची बचत होत अाहे.

शहराला बिंदुसरा प्रकल्प आणि माजलगाव बॅक वॉटर या दोन योजनांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. योजनेतून येणा-यापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी इदगाह आणि ईट या दोन ठिकाणी जलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. सततच्या पाणी शुद्धीकरणानंतर प्रकल्पामध्ये गाळ साचतो. हा गाळ धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. ईदगाह फिल्टर आणि ईट फिल्टर या दोन प्रकल्पांमधून गाळ धुतल्यानंतरचे पाणी थेट नाल्यात सोडण्यात येत होते. दररोज किंवा दोन दिवसांनंतर शुद्धीकरण यंत्र धुण्याची प्रक्रिया करावी लागते. यासाठी दोन्ही प्रकल्पातून १० लाख लिटर पाणी वाया जात हाेते. त्याची बचत हाेईल.

अशी झाली बचत
जलशुद्धीकरण यंत्रातील गाळ धुतल्यानंतर नाल्यात सोडण्यात येणारे पाणी दोन्ही प्रकल्पांजवळ खोदण्यात आलेल्या विहिरीत एकत्र करण्यात आले. विहिरीतून हे पाणी पुन्हा शुद्धीकरण प्रकल्पात सोडून रिफिल्टर केले, असे पाणीपुरवठा अभियंता एम. एस. वाघ यांनी सांगितले.

बचतीचे महत्त्व
फिल्टर धुण्यासाठी बॅक वॉश देण्यात येतो आणि हे पाणी वाया जाते. रिसायकलिंग पद्धतीने ही बचत करण्यात आली आहे. श्रीकृष्ण भालसिंग, मुख्याधिकारी, नगरपालिका, बीड