आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात ५ पालिकांवर महिला राज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्ह्यातील सहा नगरपालिका व एक नगर पंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने नगराध्यक्षपदांचे आरक्षण शुक्रवारी जाहीर केले. जिल्ह्यातील पाच नगरपालिकांचे नगराध्यक्षपद हे महिलांसाठी राखीव झाले आहे. गेवराई नगरपालिका व केज नगर पंचायतीसाठी नगराध्यक्षपद अोबीसीच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाले आहे.

नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी पालिकांची असते. त्यामुळे पालिकांकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा असतात. शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य निवडणुकीत महिलांनाही आरक्षण जाहीर झाले. महिला पालिकांतून नगराध्यक्षपदाचा कारभार सांभाळत आहेत. त्यानुसार शासनाने एक वर्ष आधीच नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर केले. सध्या बीडमध्ये महिला नगराध्यक्ष: रत्नमाला दुधाळ, अंबाजोगाईत नगराध्यक्ष रचना मोदी, माजलगाव नगराध्यक्ष पंचशीला जावळे, धारूर नगराध्यक्ष गोदावरी सिरसट या महिला आहेत. तर गेवराईत महेश दाभाडे, परळीत नगराध्यक्ष म्हणून बाजीराव धर्माधिकारी हे काम पाहत आहेत त्यानुसार चार महिला व दोन पुरुष असे नगराध्यक्ष आहेत.

आरक्षण जाहीर : बीड- ओपन महिला, अंबाजोगाई- ओपन महिला, परळी- ओपन महिला, माजलगाव- ओपन महिला, धारूर- ओबीसी महिला, गेवराई- ओबीसी सर्वसाधारण, केज- ओबीसी सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे.

लवकरच होणार निवडणुका : सहा नगरपालिकांच्या निवडणुका येत्या डिसेंबर २०१५ अखेर किंवा जानेवारी २०१६ मध्ये होण्याची शक्यता आहे.