आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळण्यातील कारच्या स्फोटात ३ बालके जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - सेलवर चालणा-या खेळण्यातील कारचा स्फोट होऊन तीन बालके जखमी झाली. ही घटना धारूर तालुक्यातील केकाणवाडी येथे शनिवारी दुपारी साडेतीन वाजता घडली. तिन्ही मुलांवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

केकाणवाडीतील उद्धव केकाण यांच्या घरी त्यांची दोन मुले राहुल (६) आणि गणेश (दीड वर्ष) तसेच कृष्णा सर्जेराव केकाण (७) ही तीन मुले कारशी खेळत असताना अचानक सेलचा स्फोट झाला. यात कृष्णा व गणेशच्या डोळ्यांना तर राहुलच्या पायाला दुखापत झाली. कृष्णाच्या बुबुळाची जखम औषधाने कमी झालेली नाही. त्याला पुढील उपचारासाठी जालना येथे जावे लागणार आहे, अशी माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. उत्तम निसाले यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.